Waterproof Pouch चा करा वापर

स्मार्टफोनमध्ये थोडेही पाणी गेल्यास डिव्हाइस खराब होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात स्मार्टफोनच्या सुरक्षेसठी तुम्ही Waterproof Pouch चा वापर करू शकता. सध्या बाजारात येणारे अनेक फोन्स IPX8 Waterproof असतात. त्यामुळे यावर पाणी पडले तरीही खराब होत नाही. मात्र, अशा फोन्सची किंमत जास्त असते. तुमचा फोन जर वॉटरप्रुफ नसल्यास तुम्ही अशा पाउचचा वापर करू शकता. ई-कॉमर्स साइट्सवर वॉटरप्रुफ पाउच १०० ते ५०० रुपये किंमतीत उपलब्ध आहेत.
Bluetooth Earphones आणि Earbuds चा करा वापर

पाऊस सुरू असताना फोनवर बोलणे शक्य होत नाही. अनेकदा आपण पाऊस सुरू असल्यावर फोन बॅगमध्ये ठेवतो. मात्र, एखादा महत्त्वाचा कॉल करायचा असल्यास अशावेळी मोठी समस्या निर्माण होते. या स्थितीमध्ये तुम्ही ब्लूटूथ इयरफोन्स आणि इयरबड्सचा वापर करू शकता. हे डिव्हाइस वॉटर आणि डस्ट प्रुफ असतात. तुम्ही स्मार्टफोनला बॅगमध्ये ठेवून इयरफोन्सच्या मदतीने कोणाशीही फोनवर बोलू शकता. तसेच, गाणीही ऐकता येतील. यामुळे तुमचा फोन देखील सुरक्षित राहील.
फोनला पॉलिबॅग आणि पेपरने झाका

अनेकदा आपण बाहेर गेल्यावर अचानक पाऊस सुरू होतो. अशावेळी स्मार्टफोन व वॉलेट भिजू नये म्हणून बरेच प्रयत्न करावे लागतात. अशा स्थितीमध्ये तुम्ही फोनला खराब होण्यापासून वाचवण्यासाठी पेपर अथवा पॉलिथिनने डिव्हाइसला झाकू शकता. ज्यामुळे तुमच्या हँडसेटमध्ये पाणी जाणार नाही व डिव्हाइस सुरक्षित राहील. यानंतर तुम्ही फोनला मऊ कपड्याने पुसून सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळे पावसाळ्यात बाहेर पडताना फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी Waterproof Pouch चा वापर करा.
वाचा: खूप खर्च न करता खरेदी करा ब्रँडेड Smart TV, Flipkart वर येतोय जबरदस्त सेल, पाहा ऑफर्स आणि सेल डेट
रेनकोटचा करा वापर

पावसाळ्यात घराबाहेर पडताना छत्री व रेनकोट कधीही विसरू नका. पावसात वारंवार भिजणे आरोग्यासाठी देखील चांगले नाही. पावसात भिजल्यास तुम्ही आजारी पडू शकता. तसेच, फोन खराब झाल्यास तुमचे आर्थिक नुकसान देखील होईल. त्यामुळे पावसाळ्यात रेनकोट घेऊनच घराबाहेर पडावे. यामुळे तुम्ही भिजण्यापासून देखील वाचाल व तुमचा हँडसेट देखील सुरक्षित राहील. तुम्ही फोनला रेनकोटच्या आतील पॉकेटमध्ये सुरक्षित ठेवू शकता. जेणेकरून, पावसाचे पाणी त्यात जाणार नाही.
फोनला त्वरित करा स्विच ऑफ

बाहेर गेल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाल्यास स्मार्टफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात प्रथम स्विच ऑफ करून खिशात ठेवा. शक्य झाल्यास फोनच्या स्पीकर, चार्जिंग आणि हेडफोनसह इतर महत्त्वाच्या भागाला झाकून घ्या, जेणेकरून त्यात पाणी जाणार नाही. समजा, तुमच्या फोनमध्ये पाणी गेल्यास त्वरित सिमकार्ड, मेमरी कार्ड काढून घ्या. फोनला मऊ कापडाने पुसून घ्या व स्विच ऑफ करून काही तास तांदळाच्या डब्ब्यात ठेवा. ज्यामुळे फोन कोरडा होईल.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times