flipkart end of season sale: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास अनेक युजर्स सेलची प्रतीक्षा करत असतात. सेलमध्ये मोठ्या ऑफसह लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करता येत असल्यामुळे ग्राहकांची मोठी बचत होते. शिवाय, सेलमध्ये ब्रँडेड स्मार्टफोन्स विक्रीसाठी उपलब्ध असल्याने नवीन फीचर्सचा देखील अनुभव देखील युजर्सना मिळतो. तुम्हीही अशाच सेलची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. नुकताच ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर एंड ऑफ सीझन सेल सुरू झाला आहे. हा सेल ११ जून ते १७ जून या कालावधीत चालणार आहे. या काळात कपड्यांपासून ते शूज आणि स्मार्टफोनपर्यंत मोठ्या सवलतीत खरेदी करता येईल. नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी हा सेल एक प्रकारे पर्वणीच आहे. सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सची माहिती जाणून घेऊया. लिस्टमध्ये Apple iPhone 12, Samsung Galaxy F23 5G, POCO C31, vivo T1 5G चा समावेश आहे.

Samsung Galaxy F23 5G

samsung-galaxy-f23-5g

Samsung Galaxy F23 5G : ८ हजारांचा ऑफ: हा सॅमसंग स्मार्टफोन ८,००० रुपयांच्या डिस्काउंटनंतर १५,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये ६ GB रॅमसह १२८ GB स्टोरेज मिळेल. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात ६.६ -इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले, ५० MP + ८ MP + २ MP ट्रिपल रिअर कॅमेरा, ८ MP फ्रंट कॅमेरा, ५००० mAh लिथियम-आयन बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक मिळतो.

वाचा :Upcoming Laptops: नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असल्यास थोडं थांबा, या महिन्यात मार्केटमध्ये एन्ट्री करणार ‘हे’ शानदार लॅपटॉप्स, पाहा लिस्ट

Poco C31

poco-c31

POCO C31 : ३५०० रुपयांचा डिस्काउंट :Poco स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये ८४९९ रुपयांना विकला जात आहे. या फोनवर ३५०० रुपयांची सूट आहे. फोनमध्ये ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेजसह ६.५३ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. यात १३ MP + २ MP + २ MP मागील कॅमेरा, ५ MP फ्रंट कॅमेरा आणि ५००० mAh बॅटरी आहे.सुरक्षेसाठी फोनच्या मागील पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फोन फेस अनलॉक सपोर्ट आहे. या व्यतिरिक्त, फोन ३.५ मिमी हेडफोन जॅक, ब्लूटूथ आवृत्ती ५, मायक्रो यूएसबी पोर्ट, वाय-फाय 802.11 b / g / n, ड्युअल VoLTE आणि VoWiFi समर्थित आहे.

वाचा :Airtel युजर्ससाठी बॅड न्यूज, वर्षभर चालणाऱ्या लोकप्रिय प्लानमध्ये आता मिळणार नाहीत ‘हे’ फायदे, पाहा डिटेल्स

Vivo T1 5G

vivo-t1-5g

vivo T1 5G : ८ हजारांचा ऑफ: : हा फोन १९,९९० रुपयांना खरेदी करता येईल Vivo T1 स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात ५० MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आहे. यासोबत २ MP + २ MP चे दोन सेन्सर आहेत. . इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात ८ GB RAM, १२८ GB स्टोरेज, ६.५८ -इंच फुल एचडी + डिस्प्ले, १६ MP फ्रंट कॅमेरा आणि ५०० mAh बॅटरी आहे.विवोच्या या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने १ टीबीपर्यंत वाढवू शकता.

वाचा: Paytm ने मोबाइल रिचार्ज करण्यासाठी मोजावे लागत आहेत अधिक पैसे, ग्राहक नाराज, पाहा डिटेल्स

iPhone 12

iphone-12

Apple iPhone 12: १२ हजारांचा ऑफ: १२,००० रुपयांच्या सवलतीनंतर तुम्ही Apple iPhone 12 स्मार्टफोन ५३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या ६४ GB वेरिएंटची आहे. फोनमध्ये ६.१ -इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले, १२ MP + १२ MP ड्युअल रीअर कॅमेरा, १२ MP फ्रंट कॅमेरा, A14 बायोनिक चिप, आणि IP68 वॉटर रेझिस्टंट रेटिंग सारखी फीचर्स आहेत. फोनच्या डिस्प्लेवर नॉच डिझाइन दिली आहे. याचा डिस्प्ले हाय रिझॉल्यूशन आणि ४के व्हिडिओ सपोर्ट करतो. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी फोनला आयपी६८ रेटिंग मिळाले. डिव्हाइस वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो.

वाचा: Internet Tips: मिनिटांत डाउनलोड होईल आवडती मूव्ही, रॉकेटच्या स्पीडने काम करेल इंटरनेट, पाहा या ट्रिक्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here