Best Feature Phones: आज भारत जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन्स बाजारांपैकी एक आहे. भारतात दर आठवड्याला नवीन स्मार्टफोन्स लाँच होत असतात. नवीन स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील कमी नाही. परंतु, स्मार्टफोन्स वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त असली तरीही फीचर फोनचा देखील वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रामुख्याने ग्रामीण भागात फीचर फोन वापरणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. अनेकजण सेकेंडरी फोन म्हणून देखील फीचर फोनचा वापर करतात. तुम्ही देखील फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अगदी २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारे चांगले फोन्स उपलब्ध आहेत. या किंमतीत तुम्ही Nokia 105 Single SIM, Lava A5, Motorola a10, Itel Ace आणि Lava FLIP फोनला खरेदी करू शकता. फीचर फोनच्या मदतीने तुम्ही कॉलिंग, चॅटिंग सारखी कामे सहज करू शकता. कमी किंमतीत येणाऱ्या या फीचर फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Nokia 105 Single SIM

nokia-105-single-sim

तुम्ही जर चांगल्या कंपनीचा कमी किंमतीत येणारा फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Nokia 105 Single SIM हा एक चांगला फोन आहे. नोकियाच्या या फोनची किंमत १,२९९ रुपये आहे. फोन खरेदीवर तुम्हाला १,२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. या फीचर फोनमध्ये तुम्ही २ हजारपर्यंत कॉन्टॅक्ट आणि ५०० एसएमएस सेव्ह करू शकता. फोनमध्ये सीरिज ३० प्लस प्रोसेसर दिला आहे. यात ३.५ एमएमचा हेडफोन जॅक देखील आहे.

वाचा: विवाहित महिला Google वर नक्की काय सर्च करतात? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

​Lava A5

lava-a5

Lava A5 फीचर फोनची किंमत १,३८४ रुपये आहे. यावर तुम्हाला १,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ०.३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यात २.४ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x३२० पिक्सल आहे. फोन २४ एमबी स्टोरेजसह येतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. Lava A5 या फीचर फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी १००० एमएएचची बॅटरी मिळते.

​Motorola a10

motorola-a10

Motorola a10 स्मार्टफोनसाठी तुम्हाला १,२९९ रुपये खर्च करावे लागतील. या फोनवर १२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. मोटोच्या या फीचर फोनमध्ये स्टोरेजला ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात ड्यूल सिमचा सपोर्ट दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी १७५० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनी या फीचर फोनवर २ वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी देत आहे. मोटोचा हा फोन ६ भारतीय भाषांमध्ये इनपूटची सुविधा देतो. यात वायरलेस एफएमची सुविधा मिळते.

वाचा: ऑफर्सचा पाऊस! Amazon वर सुरू आहे खास सेल, अवघ्या २०० रुपयांच्या बजेटमध्ये मिळतील अनेक उपयोगी वस्तू

​Itel Ace

itel-ace

Itel Ace या फीचर फोनची किंमत फक्त ८४९ रुपये आहे. या फोनला अॅमेझॉनवरून खरेदी केल्यास ८०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. फोनमध्ये १.८ इंच स्क्रीन दिली आहे. यात पॉवर बॅकअपसाठी १००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनमध्ये वायब्रेशन मोड देखील दिला आहे. याशिवाय या फीचर फोनमध्ये ८ भारतीय भाषांचा सपोर्ट मिळते. हँडसेटचे वजन फक्त ६९ ग्रॅम आहे. फोन ३.५ एमएम हेडफोन जॅकसह येतो. कॉलिंग, मेसेजसाठी हा एक चांगला फोन आहे.

​Lava FLIP

lava-flip

Lava FLIP फीचर फोन १,६९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. लावाच्या या फोनवर तुम्हाला १,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. फोन ब्लू आणि रेड कलरमध्ये येतो. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. कंपनीचा दावा आहे की, फोनची बॅटरी तीन दिवस टिकते. फीचर फोन ड्यूल सिम सपोर्टसह येतो. यात बेसिक कॅमेरा देखील आहे. पॉवरसाठी १२०० एमएएचची बॅटरी मिळते. फोनचे वजन ९६ ग्रॅम आहे.

वाचा: धुमाकूळ घालायला येतोय Samsung चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन, फीचर्स तुमचे मन जिंकेल

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here