Upcoming phones: भारतीय बाजारात दरआठवड्याला एकापेक्षा एक दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स लाँच होतात. अगदी एंट्री लेव्हलपासून ते फ्लॅगशिप स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच होत आहेत. अनेकजण दरमहिन्याला स्मार्टफोन्स बदलतात. त्यामुळे ग्राहकांची मागणी पाहून कंपन्या देखील नवनवीन फोन्स लाँच करत असतात. भारत सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारांपैकी एक आहे. अनेक स्वदेशी कंपन्यांपासून ते परदेशी कंपन्या देखील आपले शानदार हँडसेट्स भारतात लाँच करत आहे. जून २०२२ मध्ये देखील भारतात अनेक चांगले स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही दिवस वाट पाहणे नक्कीच फायद्याचे ठरेल. जून महिन्यात Poco C40, Tecno Pova 3, Poco F4 GT आणि Oppo Reno 8 Pro सारखे दमदार फोन्स लाँच होणार आहेत. या फोन्सच्या संभाव्य किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.

​Poco C40

poco-c40

Poco C40 स्मार्टफोन येत्या १६ जूनला भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत १२ हजार रुपयांपेक्षा कमी असेल. पोकोच्या या हँडसेटमध्ये ६.७१ इंच एलसीडी डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज असेल. फोन अँड्राइड ११ आधारित MIUI वर काम करेल. यात रियरला १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल.

वाचा – Godrej Fridge: डबल डोर फ्रिजवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, १५ हजारांच्या बजेटमध्ये करा खरेदी

​Tecno Pova 3

tecno-pova-3

Tecno Pova 3 स्मार्टफोन देखील याच महिन्यात भारतात लाँच होणार आहे. फोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंगसोबत ७००० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. फोन ६ जीबी रॅम आणि ५ जीबी व्हर्च्यूअल रॅम सपोर्टसह येईल. यात ६.९ इंच फुल एचडी प्लस स्क्रीन दिली जाईल. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. याशिवाय, ऑक्टा-कोर हीलियो जी८८ प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

वाचा: eSIM Transfer: भन्नाटच ! आता ब्लूटूथने ट्रान्सफर करता येणार eSIM, फॉलो करावी लागेल ही सोप्पी प्रोसेस

​Poco F4 GT

poco-f4-gt

Poco F4 GT स्मार्टफोन ६.६७ इंच एमोलेड डिस्प्लेसह येईल. यात १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळेल. फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंसाठी स्नॅपड्रॅगन ८ झेन १ प्रोसेसर दिला जाईल. याशिवाय, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज देखील मिळेल. पोकोच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सल मुख्य रियर कॅमेरा दिला जाईल. Poco F4 GT स्मार्टफोन जून महिन्यात लाँच होणार आहे. या फोनची किंमत देखील कमी असेल.

​Oppo Reno 8 Pro

oppo-reno-8-pro

Oppo आपल्या Reno 8 Pro स्मार्टफोनला लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये ६.६२ इंच ई४ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. हा डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. यात क्वालकॉम ७ झेन १ चिपसेटचा सपोर्ट मिळेल. तर फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. Oppo Reno 8 Pro च्या अधिकृत किंमत आणि फीचर्सचा खुलासा लाँचनंतरच होईल.

वाचा: OnePlus 9 5G स्मार्टफोन तब्बल १२ हजारांनी झाला स्वस्त, आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदीची संधी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here