काँग्रेसचे नेते व प्रवक्ते यांनी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनवर टीका करण्यासाठी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका मुलांचे दोन्ही पाय फुटलेले दिसत आहेत. त्यांच्या या ट्विटमधून संदेश दिला जात आहे की, हा फोटो भारतातील आहे.
या ट्विटसोबत त्यांनी #unplannedlockdown #LockdownWithoutPlan #Lockdown2 यासारखे हॅशटॅग वापरले आहे.
अनेक लोकांनी सांगितल्यानंतर त्यांनी या ट्विटनंतर आणखी एक ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. नारायणन यांनी म्हटले, मी अशा स्थितीत सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, हे वाईट आहे. मला आशा आहे की, सरकार यानंतर प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. (मी असं म्हणत नाही की, भारतात असं झालं आहे)
खरं काय आहे ?
नारायणन यांनी जो फोटो शेअर केला आहे. तो पाकिस्तानचा असून २०१८ मधील आहे.
कशी केली पडताळणी?
रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला
नावाच्या एका वेबसाइटवर ओरिजनल फोटो मिळाला.
या आर्टिकलचे शीर्षक ‘Real Face of Pakistani Democracy – Children need sponsor for medical treatment’ असे होते. हे आर्टिकल १ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशित झाले होते. या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सजावलाबाद परिसरात मुलांच्या पायांना उपचार करण्याची गरज आहे.
फोटोसोबत कॅप्शन लिहिले होते, पाकिस्तानच्या सिंध प्रांतात (सजावलाबाद) मुलांच्या पायांना उपचार करण्याची गरज आहे.
निष्कर्ष
Americai V Narayanan यांनी पाकिस्तानमधील फोटोचा वापर करीत करोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या निर्णयावर टीका केली आहे, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times