Father’s Day 2022 In India : जून महिन्यातील तिसरा रविवार खास असतो. कारण, या दिवशी जगभरात Father’s Day उत्साहात साजरा केला जातो. भारतासह अनेक देशांमध्ये लोक फादर्स डे साजरा करतात. वडिलांनी मुलासांठी घेतलेले कष्ट, त्याग, आणि प्रेमाच्या भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी अनेक मुलं त्यांच्या वडिलांना बाहेर पार्टी देतात. त्यांना विविध भेट वस्तू देतात. एकूणच Father’s Day खास बनविण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही या फादर्स डेला तुमच्या वडिलांना काहीतरी हटके Fathers day Gift देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वर्षभरासह येणाया Recharge Plans चा विचार नक्कीच करू शकता. टेलिकॉम कंपनी BSNL, Jio आणि Vi च्या सर्वोत्कृष्ट प्लान्सची सविस्तर माहिती आज आम्ही देणार आहो. जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, या प्लानमध्ये मोफत कॉलिंग, फ्री आणि डेटा सुविधा उपलब्ध आहेत.

VI Plans

vi-plans

VI चा १७९९ रुपयांचा वार्षिक प्लान : Vi बद्दल बोलायचे झाले तर, VI चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान १७९९ रुपयांचा आहे. यामध्ये यूजर्सना २४ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय, कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय ३६०० एसएमएस दिले जात आहेत. त्याच वेळी, ३६५ दिवसांची वैधता देखील दिली जात आहे. युजर्सना आणखी काही फायदे मिळतील ज्यात Vi™ चित्रपट आणि टीव्हीचा प्रवेश समाविष्ट आहे. तुम्ही वर्षभरासह येणाया प्लान्सचा विचार नक्कीच करू शकता.

BSNL Plans

bsnl-plans

बीएसएनएलचा ३६५ दिवसांचा प्लान: BSNL युजर्ससाठी हा एक चांगला प्लान आहे. BSNL च्या या प्लानची किंमत १४९९ रुपये आहे, ज्यामध्ये यूजर्सना २४ GB डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमध्येही हा डेटा वर्षभर वापरता येणार आहे. डेटा संपल्यानंतर, तुम्हाला या प्लानमधील इतर डेटा पॅक सक्रिय करून अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. खूप पैसे खर्च न करता या प्लानमध्ये मिळणाऱ्या अनेक बेनिफिट्सचा लाभ युजर्स घेऊ शकतात.

वाचा : हार्ट रेट- स्ट्रेस मॉनिटरिंगसह Amazfit Zepp E वॉच लाँच, डिव्हाइस नॉन स्टॉप ७ दिवस चालणार, पाहा किंमत

Airtel Plans

airtel-plans

Airtel चा १७९९ रुपयांचा प्लान: Airtel बद्दल बोलायचे तर, त्याचा सर्वात स्वस्त वार्षिकप्लान १७९९ रुपयांचा आहे. यामध्ये यूजर्सना २४ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय, कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय ३६०० एसएमएस दिले जात आहेत. त्याच वेळी, ३६५ दिवसांची वैधता देखील दिली जात आहे. युजर्सना अपोलो २४ I ७ सर्कल, फास्टॅगवर १०० रुपयांची सूट, मोफत हॅलोट्यून, विंक म्युझिकचा मोफत प्रवेश यासह आणखी काही फायदे मिळतील.

वाचा: नवीन हेडफोन्स खरेदी करण्यापूर्वी पाहा ही ऑफर, boAT Rockerz 660 Headphone वर मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा ऑफ

Jio Plans

jio-plans

जिओचा २९९९ रुपयांचा रिचार्ज प्लान : जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला एकूण ३६५ दिवसांची वैधता मिळत आहे. या रिचार्ज प्लानची किंमत २९९९ रुपये असून यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज २.५ GB इंटरनेट डेटा मिळतो. हा प्लान युजर्ससाठी चांगला पर्याय आहे .

२८७९ रुपयांचा जिओ रिचार्ज : जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत २८७९ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला एकूण ३६५ दिवसांची वैधता मिळत आहे. प्लानमध्ये, इंटरनेट वापरासाठी तुम्हाला दररोज २ GB इंटरनेट डेटा मिळतो.

वाचा : Smartphone Offers: ३० हजार रुपये किमतीचा Xiaomi चा ‘हा’ पॉप्युलर 5G स्मार्टफोन ४ हजारांपेक्षा कमीमध्ये न्या घरी, पाहा ऑफर

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here