Realme 9i

Realme 9i: ६४ GB स्टोरेजसह येणारा हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये १३,४९९ रुपयांना विकला जात आहे. त्याची मूळ किंमत १५,९९९ रुपये आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड युजर्सना ६७५ रुपयांची सूट मिळेल आणि एक्सचेंज ऑफरसह १२,५०० रुपयांपर्यंत बचत करता येईल. हा फोन तुम्ही फक्त ३२४ रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. फोनमध्ये ६.६ -इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले आहे. याशिवाय, फोन स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसरसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये Adreno ६१० GPU, ६ GB LPDDR4X रॅम उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Infinix Note 11

Infinix Note 11: Infinix Note 11 ची किंमत Flipkart वर १४,९९९ रुपये आहे. पण, स्मार्टफोन १०,४९९ रुपयांना विकला जात आहे. एक्सचेंज ऑफरसह, तुम्ही ९७५० रुपयांपर्यंत बचत करू शकता आणि हा स्मार्टफोन ७४९ रुपयांना खरेदी करू शकता. Infinix Note 11 मध्ये ६.७-इंच AMOLED डिस्प्ले आहे. जे FHD+ रेजोल्यूशन, 60 Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सँपलिंग रेट आणि गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनला सपोर्ट करतो. Infinix Note 11 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज देते.
Poco M4 Pro

Poco M4 Pro: १७,९९९ रुपयांचा हा Poco स्मार्टफोन १२,९९९ रुपयांना विकला जात आहे. तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास तुम्हाला १२,००० रुपयांची आणखी सूट मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही हा फोन ९९९ रुपयांना खरेदी करू शकाल. स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि होल पंच कट-आउटसह ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ स्क्रीन प्रोटेक्शनसह ऑल-प्लास्टिक बॉडी आहे. यात MediaTek Helio G९६ प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते.
वाचा: स्वस्तात मस्त वर्षभराचा रिचार्ज करून Father’s Day निमित्त वडिलांना द्या हटके गिफ्ट
Redmi 10

Redmi 10: Redmi चा हा ६४ GB स्टोरेज स्मार्टफोन ९,९९९ रुपयांना विकला जात आहे. तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात खरेदी करून तुम्ही ९,२५० रुपयांपर्यंत बचत करू शकता. तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, या फोनची किंमत तुमच्यासाठी ७४९ रुपये असू शकते. Redmi 10 च्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर, २ मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा सेंसर देखील तुम्हाला यात मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.
वाचा: हार्ट रेट- स्ट्रेस मॉनिटरिंगसह Amazfit Zepp E वॉच लाँच, डिव्हाइस नॉन स्टॉप ७ दिवस चालणार, पाहा किंमत
Samsung Galaxy F22

Samsung Galaxy F22: सॅमसंगचा १६,९९९ रुपयांचा स्मार्टफोन १२,४९९ रुपयांना विकला जात आहे. एक्सचेंज ऑफरचा संपूर्ण लाभ घेऊन तुम्ही ११,७५० रुपयांपर्यंत बचत करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा फोन ७४९ रुपयांना खरेदी करू शकता. Samsung Galaxy F22 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच (१६०० x ७२० पिक्सल) एचडी+ इनफिनिटी-यू सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G८० प्रोसेसरसोबत येतो,जो १२एमएम प्रोसेसरवर आधारित आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times