नवी दिल्लीः ‘करोना’ विषाणूच्या फैलावामुळे ‘लॉकडाउन’ लागू करण्यात आल्याने भारतासह जगातील अनेक देशांत सध्या ‘झूम’ हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ‘अॅप’ लोकप्रिय झाले आहे. सर्रास या ‘अॅप’चा वापर होताना दिसत आहे. मात्र, ‘हे अॅप सुरक्षित नाही. त्यामुळे, त्याचा वापर करताना सावधगिरी बाळगा,’ असा इशारा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिला आहे; तसेच या ‘अॅप’चा वापर करणाऱ्यांसाठी नऊ मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या सर्व घडामोडीनंतर झूम अॅपचे सीईओ एरिक युआन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

वाचाः

झूमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी कंपनीच्या डेटा आणि हॅकिंग संदर्भात माहिती दिली. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग कॉल मध्ये जबरदस्ती घुसखोरी करणे म्हणजे झूम बॉम्बिंग मध्ये येत असलेली अडचणी विरोधात लवकरच पाऊल उचलण्यात येणार आहे. झूमने एका ऑनलाइन पोस्टमध्ये म्हटले, चीनमधील बैठकीच्या सर्व्हरचा उद्देश हा नेहमी सुनिच्छीत करणे होय. चीनमधील बाहेर झालेल्या बैठकीची आकडेवारी चीनच्या बाहेरच आहेत. झूममधील लोकांचे युजरनेम आणि पासवर्ड कशी चोरी करतात, हे शोधण्यासाठी सिस्टम बनवणे सुरू आहे, असे झूमने म्हटले आहे. झूमच्या अॅपमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या टूलबारचा समावेश आहे.

वाचाः

गृह मंत्रालयानं ‘झूम’बाबत देण्यात आलेल्या सूचना..

>> प्रत्येक मिटिंगसाठी वेगळा युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करा

>> जॉईन ऑप्शन डिसएबल करावं

>> वेटिंग रुमला एनेबल करावं त्यामुळे इतर युझर्स तेव्हाच यात सहभागी होऊ शकतील जेव्हा कॉन्फरन्स घेणाऱ्याकडून परवानगी मिळेल

>> स्क्रीन शेअरिंगचा पर्याय केवळ होस्टगकडे असेल

>> फाईल ट्रान्सफरच्या पर्यायाचा वापर कमी ठेवा

>> कोणत्याही व्यक्तीला रिजॉईन होण्याचा पर्याय बंद ठेवा

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here