Apple Watch SE

Apple Watch SE फादर्स डे ला वडिलांना गिफ्ट देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या स्मार्टवॉचची किंमत २९,९०० रुपये आहे. अॅपल वॉच शानदार चिपसेटसह येते. यात एक स्पीकर, एक मायक्रोफोन आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० दिली आहे. यात सिरीचा देखील सपोर्ट मिळतो. यात फॉल डिटेक्शन आणि इमर्जेंसी एसओएस कॉलिंग सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर हेल्थ फीचर्स देखील मिळतील.
वाचा: बाबो! ४६ वर्ष जुन्या Apple-1 कॉम्प्युटरची ‘इतक्या’ कोटींना विक्री, किंमत वाचून धक्का बसेल
Amazon Echo Dot 4th gen

Amazon Echo Dot 4th gen सध्या फक्त ३,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. फादर्स डे ला गिफ्ट करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हा स्मार्ट स्पीकर अॅलेक्सा सपोर्टसह येतो. यात इंग्रजी व हिंदी दोन्ही भाषांचा सपोर्ट मिळेल. स्पीकर स्मार्ट प्लग, एसी, लाइट बल्ब, एअर प्यूरीफायर आणि इतर स्मार्ट प्रोडक्टला सहज कंट्रोल करू शकतो. तुम्ही जर कमी किंमतीत उपयोगी येणारी वस्तू शोधत असाल हा स्मार्ट स्पीकर देऊ शकता.
आयपॅड एअर 2022

आयपॅड एअर 2022 ची किंमत ५४,९०० रुपये आहे. आयपॅड लिक्विड रेटिना डिस्प्ले, टच आयडी आणि ऑल-स्क्रीन डिझाइनसह येतो. कंपनीने ३.८ मिलियन पिक्सलसह १०.९ इंच डिस्प्ले दिला आहे. याचा पीक ब्राइटनेस ५०० निट्स आहे. डिस्प्लेमध्ये फुल लेमिनेशन, पी३ वाइड कलर सरगम, ट्रू टोन आणि एक अँटी-रिफ्लेक्टिव्ह स्क्रीन कोटिंग आहे. यावर चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी लँडस्केप स्टीरियो स्पीकर दिले आहेत. टच आयडी याच्या टॉप बटनवर आहे.
सारेगामा कारवां गोल्ड

तुमच्या वडिलांना जर गाणी ऐकण्याची आवड असल्यास यासारखे बेस्ट गिफ्ट कोणतेच नसेल. सारेगामा कारवां गोल्ड हा म्यूझिक प्लेअर लता मंगेशकर, किशोर कुमार इत्यादी गायकांच्या ५ हजार पेक्षा अधिक प्री-रेकॉर्डेड गाण्यासह येतो. यात १३० पेक्षा अधिक स्टेशन आहे. म्यूझिक प्लेअरला तुम्ही कारवा अॅपद्वारे ऑपरेट करू शकता. यात ब्लूटूथचा देखील सपोर्ट मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी ऑक्स इन आणि यूएसबी पोर्ट दिला आहे. याची किंमत १०,९९० रुपये आहे.
Apple AirTag

Apple AirTag द्वारे आयफोन यूजर्स बॅग व इतर गॅजेट्सला ट्रॅक करू शकतात. हे डिव्हाइस वॉटरप्रुफ असून, याची किंमत ३,१९० रुपये आहे.
Garmin Forerunner 55
Garmin Forerunner 55 फिटनेस स्मार्ट वॉच तुमच्यासाठी वडिलांसाठी एक चांगले गिफ्ट आहे. स्मार्टवॉचचे वजन खूपच कमी असून, स्लीम लूक असते. यामध्ये वेगवेगळे हेल्थ फीचर्स दिले आहेत.यात रनिंग मोड्स, डेली ट्रेनिंग टिप्स आणि हेल्थ मॉनिटरचा समावेश आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times