Flipkart End of Season Sale: भारतीय बाजारात दर आठवड्याला नवीन स्मार्टफोन्स लाँच होत आहेत. अगदी कमी किंमतती दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही जर स्वतःसाठी अथवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर सुरू असलेला सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. सध्या Flipkart End of Season Sale सुरू आहे. या सेलचा आज शेवटचा दिवस असून, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी आहे. Flipkart Sale मध्ये तुम्ही स्मार्टफोन्ससोबतच लॅपटॉप व कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक वस्तू बंपर डिस्काउंट आणि ऑफर्ससह खरेदी करू शकता. सेलमध्ये वस्तूंवर बँक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. सेलमध्ये Moto G51,Apple iPhone 12, Redmi Note 10S आणि Samsung Galaxy F12 सारखे स्मार्टफोन्स आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहेत. सेलमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Moto G51

moto-g51

डिसेंबरमध्ये लाँच झालेला मोटो जी५१ स्मार्टफोन फ्लिपकार्टवर १३,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनवर १२,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ७५० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. फोनमध्ये ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ४८० प्लस ५जी प्रोसेसर, ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज, फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.

वाचा: सोशल मीडिया सेफ ठेवायचाय?, ‘या’ ८ टिप्सचा वापर करा

​Apple iPhone 12

apple-iphone-12

Apple iPhone 12 स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये ५३,९९९ रुपये किंमतीत लिस्टेड आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये फोन खरेदी करताना अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ७५० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. iPhone 12 मध्ये ए१४ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळतो. हँडसेटमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला देखील १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोन ६४ जीबी स्टोरेजसह येतो.

वाचा: Best Plans: वारंवार रिचार्जचे टेन्शनच नाही, ५ रुपये रोजच्या खर्चात ९० दिवसांची व्हॅलिडिटी, फ्री कॉल्ससह ‘हे’ फायदे, पाहा डिटेल्स

​Redmi Note 10S

redmi-note-10s

Redmi Note 10S स्मार्टफोनवर ICICI बँक क्रेडिट कार्ड नॉन ईएमआय ट्रांजॅक्शनवर १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट आणि ईएमआयवर १,२५० रुपये इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, HDFC बँक क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय ट्रांजॅक्शनवर १,२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. फोनवर १२,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ६.४३ इंच फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल रियर कॅमेरा, ५००० एमएएच लीथियम-पॉलिमर बॅटरी, मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसर दिला आहे.

​Samsung Galaxy F12

samsung-galaxy-f12

Samsung Galaxy F12 स्मार्टफोनला खरेदी करताना अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ७५० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के डिस्काउंट दिले जात आहे. याशिवाय, ८,७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. हा फोन सेलमध्ये ९,४९९ रुपयात उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले, Exynos ८५० प्रोसेसर, ४ जीबी रॅम + ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि फोटोग्राफीसाठी रियरला ४८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

वाचा: Smartphone Tips : स्लो स्मार्टफोनचे टेन्शन विसरा, स्पीड होणार सुपरफास्ट, फॉलो करा ‘या’ सोप्पी टिप्स

  • सॅमसंग गॅलेक्सी एफ12
  • G231595

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here