वाचाः
पहिल्या लॉकडाऊनमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाइल युजर्संना १७ एप्रिल पर्यंत वैधता वाढवली होती. ही वैधता वाढवण्यात आल्याने प्री पेड ग्राहकांची वैधता संपणार होती. त्या युजर्संना मोठा दिलासा मिळाला होता. देशभरात सध्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्यामुळे युजर्संना अडचणीचा सामना करावा लागू नये, म्हणून येत्या ३ मे पर्यंत युजर्संची इनकमिंग सुरू राहणार आहे. एकीकडे या कंपन्यांनी वैधता वाढवली असली तरी जिओने मात्र अद्याप वैधता वाढवण्याची कोणतीही घोषणा केली नाही.
वाचाः
सर्वात आधी टेलिकॉम कंपन्यांनी एटीएम आणि मिस्डकॉलवरून मोबाइल रिचार्ज करण्याची सुविधा दिली होती. तसेच दुसऱ्यांचे रिचार्ज करणाऱ्या युजर्संना कंपन्यांनी ४-६ टक्के कमिशन देण्यास सुरुवात केली आहे.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times