नवी दिल्लीः tecno pova 3 launched in india : टेक्नो कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Tecno Pova 3 ला आज अधिकृतपणे भारतात लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कंपनीने या फोनमध्ये सर्वात मोठी बॅटरी 7,000mAh दिली आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G88 SoC दिले आहे. या फोनला Pova series अंतर्गत लाँच करण्यात आले असून हा फोन बजेट स्मार्टफोन आहे. या फोनची फक्त अमेझॉन Amazon वरून विक्री करण्यात येणार आहे. ग्राहक या फोनला २७ जून पासून अमेझॉनवरून खरेदी करू शकतील. या फोनची किंमत आणि फीचर्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.

Tecno Pova 3 ची भारतातील किंमत
कंपनीने Tecno Pova 3 या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत ११ हजार ४९९ रुपये ठेवली आहे. ही किंमत ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची आहे. १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ४९९ रुपये ठेवली आहे. या फोनला तीन कलर मध्ये Electric Blue, Tech Silver, आणि Eco Black अशा तीन कलरमध्ये आणले गेले आहे.

Tecno Pova 3: Sale Date and Offers
टेक्नोच्या या स्मार्टफोनला २७ जून पासून अमेझॉनवरून विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे. ही फोनची स्पेशल लाँच किंमत ऑफर आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ICICI Amazon Pay credit कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक ऑफर सुद्धा मिळू शकणार आहे.

वाचा :Smartwatch: Maxima Max Pro Turbo स्वस्तात लाँच, डिव्हाइस तुमच्या SPO2-हार्ट रेट आणि स्लिपींग पॅटर्नवरही ठेवणार वॉच

Tecno Pova 3: Specifications and Features
Tecno Pova 3 स्मार्टफोनमध्ये ६. ९ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 2460 x 1080 पिक्सेल रिझॉल्यूशन आणि 180Hz टच सँम्पलिंग रेट दिले आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये octa-core MediaTek Helio G88 गेमिंग सेंट्रिक बजेट SoC सोबत गेमिंग इंजिन 2.0. दिले आहे. या फोनला दोन व्हेरियंट 4GB + 64GB आणि 6GB + 128GB variant मध्ये आणले आहे. तसेच या फोनमध्ये 5GB अतिरिक्त व्हर्च्युअल मेमरी सुद्धा मिळणार आहे. या फोनचे सर्वात खास फीचर म्हणजे यात 7,000mAh battery दिली आहे. तसेच 33W fast charging सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी 8MP सेल्फी स्नॅपर दिला आहे. फोनमध्ये 10W reverse wired charging सपोर्ट दिले आहे.

वाचाः जुना फोन द्या आणि स्वस्तात खरेदी करा iPhone, ‘या’ मॉडेलवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूटTecno Pova 3 स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार, पाहा संभावित किंमत-फीचर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here