Smartphone with Qualcomm Snapdragon 888 : स्मार्टफोन युजर्ससाठी आजकाल मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आदी १० ते १५ हजारांपासून ते ४०-५० हजार रुपयांपर्यतचे अनेक स्मार्टफोन्स आता बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ह्लाही चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल जो खूप महाग नाही आणि शक्तिशाली प्रोसेसरसह येतो तर तुमच्याकडे अनेक ब्रँडेड फोन्सचा पर्याय आहे. Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर सुमारे एक वर्षापूर्वी ;औंच करण्यात आला होता. स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटमध्ये उत्तम कामगिरीसह आधुनिक कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. हा चिपसेट असलेले स्मार्टफोन ३०००० ते ४०००० रुपयांच्या दरम्यान घेता येतात. आज आम्ही तुम्हाला स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर असलेल्या सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत जे तुम्ही सध्या खरेदी करू शकता. लिस्टमध्ये Mi 11X Pro, iQOO 9 SE, Realme GT , Mi 11T Pro सारख्या फोन्सचा समावेश आहे .

Mi 11T Pro

mi-11t-pro

Mi 11T Pro: या यादीतील Mi 11T Pro हा कंपनीचा दुसरा फोन आहे. Xiaomi 11T Pro हा कंपनीचा फोन आहे. जो Snapdragon 888 प्रोसेसरसह येतो. Mi 11T Pro – किंमत ३४, ७०० रुपये आहे. याशिवाय हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये खरेदी करता येईल. या Xiaomi स्मार्टफोनमध्ये १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.६७ इंच डिस्प्ले आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूस 108 MP Samsung HM2 सेंसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये गोरिला ग्लास व्हिक्टस संरक्षण आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत.

वाचा :Smartwatch: Maxima Max Pro Turbo स्वस्तात लाँच, डिव्हाइस तुमच्या SPO2-हार्ट रेट आणि स्लिपींग पॅटर्नवरही ठेवणार वॉच

Realme GT 2

realme-gt-2

स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह नवीन Realme GT 2 ची किंमत ३४,९९९ रुपये आहे. Realme GT 2 मध्ये १२० Hz च्या रीफ्रेश दरासह ६.६२ -इंचाचा डिस्प्ले आहे. स्क्रीन HDR10+ ला सपोर्ट करते. Realme च्या या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी आणि १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी, ६५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

वाचा: Tokenization System: १ जुलैपासून ऑनलाइन पेमेंटसाठी डेबिट-क्रेडिट कार्डमध्ये होणार ‘हे’ बदल, पाहा डिटेल्स

One Plus 9

one-plus-9

OnePlus 9 चा हा स्मार्टफोन ३७,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये Hasselblad ब्रँड लेन्स उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. या OnePlus स्मार्टफोनमध्ये ६. ५५ इंच डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz आणि गोरिला ग्लास 5 संरक्षण आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सेल प्रायमरी, ५० मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. फोनच्या पुढील बाजूस १६ -मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेट ६५ W जलद चार्जिंगसह ४५०० mAh बॅटरी पॅक करते. स्मार्टफोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

वाचा : Online Frauds: ऑनलाइन फसवणूक झाल्यास ‘हे’ ६ क्रमांक करतील मदत, पैसे देखील मिळतील परत, पाहा डिटेल्स

iQOO 9 SE

iqoo-9-se

iQOO 9 Series ची ही नवीन परवडणारी आवृत्ती स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरसह येते. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ३३,९९९ रुपयांपासून सुरू होते. यात १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.६२ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये ४८ मेगापिक्सेल प्राइमरी आणि १३ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड रियर कॅमेरासह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये यूजर्सना स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनला ६६ W फास्ट चार्जिंगसह ४५०० mAh बॅटरीचा सपोर्ट आहे.

वाचा : Smartphone Offers: ६४ MP कॅमेरासह पॅक्ड रेडमीचा ‘हा’ स्मार्टफोन स्वस्तात होईल तुमचा, मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा ऑफ

Mi 11X Pro

mi-11x-pro

Mi 11X Pro: Mi 11X Pro स्मार्टफोन डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. फोनची किंमत ३४,९९९ रुपये आहे. फोन स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर असलेला हा स्मार्टफोन तुम्ही ४० हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करू शकता. Mi 11X Pro मध्ये ६.६७ -इंचाचा 120 Hz AMOLED डिस्प्ले आहे. ८ GB पर्यंत RAM आणि २५६ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये 8K रेकॉर्डिंगसह १०८ -मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. ४२५० mAh बॅटरीसह फोनमध्ये ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पीकर देण्यात आले आहेत.

वाचा : Electricity Bill: वाढत्या वीज बिलाने टेन्शन आलं असेल तर फॉलो करा ‘या’ बेसिक टिप्स, बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here