नवी दिल्लीः Realme Q5x launched : Realme ने चीन मध्ये आपला Q सीरीजचा नवीन हँडसेट लाँच केला आहे. Realme Q5x कंपनीचा लेटेस्ट फोन आहे. याआधी या सीरीजमध्ये Realme Q5i, Realme Q5 आणि Realme Q5 Pro स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. रियलमीच्या या लेटेस्ट स्मार्टफोनध्ये ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले, ६४ जीबी स्टोरेज सारखे खास फीचर्स दिले आहेत. Realme Q5x स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स संबंधी जाणून घ्या.

Realme Q5x price
Realme Q5x ला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत लाँच करण्यात आले आहे. रियलमीच्या या फोनची किंमत ९९९ युआन म्हणजेच जवळपास ११ हजार ७०० रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला क्लाउड ब्लॅक आणि स्टार ब्लू कलर मध्ये लाँच केले आहे. Realme Q5x या फोनचा पहिला सेल २३ जून रोजी सुरू होणार आहे. कंपनीने या फोनला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. चीनच्या बाहेर या फोनला कधीपर्यंत लाँच केले जाईल, या संबंधी अद्याप कोणतीही माहिती शेअर केली नाही.

वाचाः जुना फोन द्या आणि स्वस्तात खरेदी करा iPhone, ‘या’ मॉडेलवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

Realme Q5x specifications
रियलमीच्या Realme Q5x फोनमध्ये ६.५ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन एचडी प्लस रिझॉल्यूशन (720 x 1600 पिक्सल) सोबत येतो. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोनमध्ये डिस्प्ले वर टियर ड्रॉप नॉच स्क्रीन आहे. स्क्रीन टू बॉडी रेशियो ८८.७ टक्के आहे. हँडसेटची रुंदी ८.१ मिलीमीटर आहे. याचे वजन फक्त १८४ ग्रॅम आहे. रियलमीच्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट दिला आहे. या प्रोसेसर मध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा ऑप्शन दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोन अँड्रॉयड १२ ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड Realme Ui 3.0 स्किन सोबत येतो.

वाचा :Smartwatch: Maxima Max Pro Turbo स्वस्तात लाँच, डिव्हाइस तुमच्या SPO2-हार्ट रेट आणि स्लिपींग पॅटर्नवरही ठेवणार वॉच

फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी या फोनमध्ये रियरवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. जो एलईडी फ्लॅश सोबत येतो. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ०.३ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 10W चार्जिंग सपोर्ट करते. फोनच्या बाजुला सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. हँडसेट ड्युअल सिम सपोर्ट करतो. यात कनेक्टिविटीसाठी 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक सारखे फीचर्स दिले आहेत.

लाँचिंगआधीच Poco F4 5G ची किंमत उघड, पाहा बजेटमध्ये आहे की नाहीया कंपनीने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, 5000mAh बॅटरी, आकर्षक डिझाइन किंमत ७ हजारांपासून सुरूBest Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या ‘या’ स्मार्टफोन्सचा मार्केटमध्ये धुमाकूळ, तुमचा फेव्हरेट कोणता ?

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here