नवी दिल्लीः टेक कंपनी Honor ने आपला आणखी एक लेटेस्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच केलेल्या ऑनर २० चे अपग्रेडेड व्हर्जन असल्याचे बोलले जात आहे. युजर्संना या फोनमध्ये ४ जीबी रॅम, एचडी डिस्प्ले आणि जबरदस्त प्रोसेसरचा सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने नुकतेच ९एक्स लाइट स्मार्टफोनला लाँच केले आहे. Honor 20e या स्मार्टफोनला भारतात कधी लाँच करण्यात येणार आहे, यासंबंधी कंपनीने अद्याप माहिती दिली नाही.

Honor 20e ची किंमत
Honor 20eच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८० युरो म्हणजेच १४ हजार ८०० रुपये आहे. या स्मार्टफोनला ब्लॅक आणि फँटम ब्लू कलर या दोन रंगात खरेदी करता येवू शकते.

Honor 20e चा कॅमेरा
युजर्संना या फोनमध्ये बॅक पॅनेलमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप मिळणार आहे. ज्यात २४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. तसेच फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Honor 20e चे वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.२१ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. तसेच या फोनमध्ये ऑक्टा-कोर किरीन ७१० एफ चिपसेट सपोर्ट दिला आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड ९ वर आधारीत ईएमयूआय ९.१ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Honor 20e ची बॅटरी
कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाईप सी यासारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच या फोनमध्ये ३४०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच १० वॅट चार्जिंगचा फास्ट सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here