Sennheiser CX 120BT

Sennheiser CX 120BT इयरफोन्सची किंमत १,२९० रुपये आहे. हा इन-इयर वायरलेस इयरफोन्स असून, जो नेकबँड डिझाइनसह येतो. यात aptX आणि SBC कोडेकचा सपोर्ट दिला आहे. इयरफोन्स लो लेटेंसीसह हाय-क्वालिटी ऑडिओ आउटपट प्रदान करतात. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन ४.१ चा सपोर्ट मिळतो. Sennheiser CX 120BT मध्ये ६ तासांची दमदार बॅटरी लाइफ दिली आहे. या इयरफोन्सला फुल चार्ज होण्यासाठी १.५ तास लागतात.
Sony MDR-XB55AP

Sony MDR-XB55AP हा एक वायर्ड इयरफोन आहे. यामध्ये डीप बेस देण्यात आला आहे. सोबतच, इन-लाइन माइक देखील दिला असून, कॉलिंगसाठी उपयोग होतो. इयरफोनमध्ये हँड्स-फ्री कॉलिंगसाठी प्ले व पॉज कंट्रोलची सुविधा आहे. यामध्ये १२ एमएम नियोडिमियम ड्राइव्हर दिले असून, जे शानदार साउंड प्रदान करतात. हे तीन सिलिकॉम इयरबड्ससह येतात. सोनीचे हे इयरफोन्स एर्गोनॉमिक डिझिनसह येतात. Sony MDR-XB55AP ला तुम्ही १,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
JBL C200SI by Harman Earphones

JBL आपल्या शानदार ऑडिओ प्रोडक्ट्ससाठी ओळखले जाते. JBL C200SI by Harman Earphones प्रीमियम साउंड क्वालिटी प्रदान करतात. यात दमदार बेससाठी ९ एमएमचे ड्राइव्हर दिले आहेत. हे हलके व आरामदायक आहेत. यात तीन वेगवेगळ्या साइजचे इयरबड्स दिले आहेत. यामुळे तुम्हाला कॉलिंगचा चांगला अनुभव मिळेल. यामध्ये नॉइस-आयसोलेट मायक्रोफोन दिले आहेत. हे प्रीमियम मेटेलिक फिनिशसह येतात. JBL C200SI by Harman Earphones ची किंमत ७९९ रुपये आहे.
वाचा: Amazon Sale: चक्क अर्ध्या किंमतीत मिळतायत ३२ इंच स्क्रीनसह येणारे टॉप-५ स्मार्ट टीव्ही; पाहा लिस्ट
boAt Rockerz 330 Pro

boAt Rockerz 330 Pro हे ब्लूटूथ वायरलेस इन-इयर इयरफोन्स आहेत. बोटचे हे इयरफोन्स नेकबँड डिझाइनसह येतात. यामध्ये ६० तासांचा प्लेटाइम दिला आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्ही५.२ चा सपोर्ट मिळतो. यात मॅग्नेटिक इयरबड्स दिले आहेत. बेससाठी १० एमएमचे ड्राइव्हर्स देखील आहेत. विशेष म्हणजे हे एकाचवेळी दोन डिव्हाइसला कनेक्ट होतात. boAt Rockerz 330 Pro ची किंमत १,४९९ रुपये आहे. गाणी ऐकण्याची आवड असल्यास हे नेकबँड इयरफोन्स चांगला पर्याय ठरतील.
boAt Airdopes 171 Bluetooth Truly Wireless in Ear Earbuds

boAt Airdopes 171 हे वायरलेस इयरबड्स आहेत. सिंगल चार्जमध्ये बोट्सच्या या बड्सला तुम्ही १३ तास वापरू शकता. हे आयपीएक्स४ रेटिंगसह येतात. यामध्ये ड्यूल टोन फिनिश माइक दिला आहे. तसेच, स्टीरियो कॉलिंग फीचर देखील मिळते. इयरबड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्ही५.२ चा सपोर्ट मिळतो. boAt Airdopes 171 इयरबड्सला तुम्ही फक्त १,४९९ रुपयात खरेदी करू शकता. हे इयरबड्स प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर स्वस्तात उपलब्ध आहेत.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times