Free Movies Download: सध्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपटांचा आनंद घेण्याऐवजी घरबसल्याच स्मार्ट टीव्ही, फोनच्या माध्यमातून नवनवीन चित्रपट पाहत आहेत. सध्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाल्याने स्मार्टफोनवरच सहज चित्रपट पाहता येतो. मात्र, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, झी5, डिज्नी+ हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी दरमहिन्याला शेकडो रुपये खर्च करावे लागतात. तुम्हाला देखील नवीन चित्रपट, सीरिज पाहण्याची आवड असेल व ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी जास्त पैसे खर्च करायचे नसल्यास काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. याद्वारे तुम्ही एकही रुपया न खर्च करता मोफत नवनवीन चित्रपट पाहू शकता. अनेकजण मेसेजिंग अ‍ॅप टेलिग्रामचा चित्रपट व सीरिज डाउनलोड करण्यासाठी उपयोग करतात. परंतु, या व्यतिरिक्त देखील काही अशा वेबसाइट्स आहे, जेथून तुम्ही अगदी मोफत चित्रपट व वेब सीरिज सहज डाउनलोड करता येईल. या वेबसाइट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Archive.org

archive-org

तुम्हाला जर नवीन चित्रपट पाहण्याची आवड असल्यास The Internet Archive एक चांगली वेबसाइट आहे. यावर तुम्हाला लाखो पुस्तक, गाणी, चित्रपट, सॉफ्टवेअर, वेबसाइट व इतर गोष्टींचा मोफत फायदा मिळेल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च कराव लागणार नाही. ही एक non-profit library आहे. तुम्ही मोबाइल फोन व अन्य डिव्हाइसच्या माध्यमातून अगदी सहज चित्रपट डाउनलोड करू शकता. येथून तुम्ही हॉलिवूडचे चित्रपट देखील डाउनलोड करू शकता.

वाचा: iPhone 14 खरेदी करायचाय? लाँचआधीच जाणून घ्या संभाव्य फीचर्स

​YouTube

youtube

YouTube हा सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. यावर दररोज शेकडो वेगवेगळ्या प्रकारातले व्हिडिओ अपलोड केले जातात. तसेच, हे व्हिडिओ पाहण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. YouTube वर शेकडो हॉलिवूड, बॉलिवूड आणि टॉलिवूडचे चित्रपट उपलब्ध आहे. या चित्रपटांना तुम्ही एकदा डाउनलोड केल्यावर ऑफलाइन मोडमध्ये देखील पाहू शकता. तुम्हाला जर YouTube वरून मोबाइल डिव्हाइसवर व्हिडिओ डाउनलोड करायचा असल्यास SaveFrom.net सारख्या वेबसाइटचा वापर करू शकता.

​Hulu.com

hulu-com

Hulu एक ऑनलाइन movie-streaming platform आहे. या प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. एकदा डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इंटरनेट कनेक्शन नसताना देखील चित्रपट पाहू शकता. Hulu.com वर चित्रपट पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता असली तरीही तुम्हाला १ महिन्याचे फ्री ट्रायल देखील मिळते. १ महिना तुम्हाला मोफत चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येईल. १ महिन्यानंतर तुम्ही सबस्क्रिप्शन बंद करू शकता.

वाचा: Postpaid Plan: Netflix, Amazon Prime, Hotstar एकदम फ्री, पाहा ‘हे’ कमी किंमतीतील धमाकेदार प्लान्स

​Public Domain Torrents

public-domain-torrents

Public Domain Torrents वरून देखील तुम्ही अनेक लोकप्रिय चित्रपट डाउनलोड करू शकता. हा क्लासिक व जुन्या चित्रपटांचा एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही मोबाइल डिव्हाइससह कॉम्प्युटरवर देखील मोफत चित्रपट डाउनलोड करू शकता. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले चित्रपट सहज मिळतील. तुम्हाला जर जुने, क्लासिक चित्रपट पाहायचे असल्यास हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही पैसे देखील द्यावे लागत नाही.

​Vudu.com

vudu-com

Vudu.com एक प्रीमियम सबस्क्रिप्शन बेस्ड मूव्ही स्ट्रिमिंग वेबसाइट आहे, जी एक फ्री सेक्शन देखील प्रदान करते. येथून तुम्ही लोकप्रिय चित्रपट TV Shows ला मोफत डाउनलोड करू शकता. मात्र, Vudu.com वर चित्रपट व सीरिजला वर मोफत पाहताना जाहिराती देखील येतात. जाहिराती नको असतील तर प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. जर ऑनलाइन स्ट्रीमिंगमध्ये समस्या येत असल्यास तुम्ही चित्रपटांना डाउनलोड करून देखील पाहू शकता.

वाचा: Recharge Plans: अवघ्या १९ रुपयात महिनाभर सुरू राहील तुमचा मोबाइल नंबर, या टेलिकॉम कंपनीने लाँच केला प्लान

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here