शाओमी बुक एस २ एन १ चे फीचर आणि स्पेसिफिकेशन
कंपनी या लॅपटॉप मध्ये 2560×1600 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत १२.४ इंचाचा एलसीडी देत आहे. लॅपटॉपमध्ये मिळणारा स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. कंपनीचा हा पहिला फोन २ इन १ लॅपटॉप स्लिम बेजल्स सोबत येतो. कंपनी यात १६.१० चे आस्पेक्ट रेशियो देत आहे. डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस लेवल ५०० निट्स पर्यंत आहे. हा लॅपटॉप ७२० ग्रॅम आहे. याची थिकनेस 8.95mm आहे.
वाचाः iPad आणि iPod मध्ये नक्की काय फरक? पाहा डिटेल्स
लॅपटॉपला कंपनीने अॅल्यूमिनियम-मॅग्नीशियम अलॉयने तयार केले आहे. जी याच्या लूकला कॉफी प्रीमियम बनवते. शाओमी बुक एस मध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कॉलिंग आणि साउंडसाठी कंपनी यात दोन मायक्रोफोन सोबत ड्युअल स्पीकर सिस्टम देत आहे. हा लॅपटॉप ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी यात स्नॅपड्रॅगन 8cx Gen2 ऑफर करते. कंपनी यात पॉवरफुल बॅटरी देत आहे. ही बॅटरी एकदा चार्ज झाल्यानंतर १३.४ तासांपर्यंत चालू शकते. वायरलेस कनेक्टिविटीसाठी यात तुम्हाला वाय फाय 5 (ac) आणि ब्लूटूथ ५.१ सारखे ऑप्शन मिळतील.

वाचाः भन्नाट फीचर्ससह Xiaomi चा २-इन-१ लॅपटॉप लाँच, टॅबलेट म्हणूनही करा वापर; पाहा किंमत
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times