Redmi 9A Sport

Redmi 9A Sport स्मार्टफोनची सुरुवाती किंमत फक्त ६,७९९ रुपये आहे. ही किंमत फोनच्या २ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. रेडमीच्या या फोनमध्ये ६.५३ इंच एचडी+ स्क्रीन दिली असून, यात फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन MediaTek Helio G२५ सह येतो.
वाचा: Email Scams: इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठा स्कॅम, लोकांनी गमावले तब्बल १८७ अब्ज रुपये; पाहा कसे?
JioPhone Next

कमी बजेटमध्ये येणारा JioPhone Next देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या फोनसोबतच तुम्हाला जिओच्या प्लान्सचा देखील फायदा मिळेल. या फोनला तुम्ही फक्त ४,५९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह येतो. यात फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ३५०० एमएएचची बॅटरी मिळेल. JioPhone Next ला तुम्ही वेगवेगळ्या ईएमाय ऑफरसह देखील खरेदी करू शकता.
Nokia C01 Plus

Nokia C01 Plus मध्ये ५.४५ इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यात फोटोग्राफीसाठी ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि तर फ्रंटला सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोन Unisoc SC९८६३A प्रोसेसर सपोर्टसह येतो. तर पॉवर बॅकअपसाठी ३००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन २ जीबी रॅम + १६ जीबी स्टोरेजसह येतो. Nokia C01 Plus फोनला ६,२९९ रुपयात खरेदी करू शकता.
Lava X2

Lava X2 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio A२५ प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. लावाचा हा फोन ६.५ इंच एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह येतो. यात फोटोग्राफीसाठी रियरला ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले असून, याची किंमत फक्त ५,९९९ रुपये आहे.
Tecno Pop 5 LTE

Tecno Pop 5 LTE स्मार्टफोन देखील कमी बजेटमध्ये येणारा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये ६.५२ इंच डॉट नॉच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनमध्ये रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. Tecno Pop 5 LTE फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times