भारतात असे अनेक मोबाइल यूजर आहेत. जे अनेक वेळा नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत. तसेच असेही अनेक फोन यूजर्स आहेत. ज्यांना महाग स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. परंतु, त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे अशा दोन्ही यूजर्ससाठी बेस्ट ऑप्शन हाच आहे की, त्यांनी Second Hand Mobile Phone किंवा Refurbished phone खरेदी केल्यास त्यांचा आवडता स्मार्टफोन त्यांना खरेदी करता येईल. सेकंड हँड मोबाइल किंवा रिफर्बिश्ड फोन म्हणजे कुणी तरी आधीच या फोनला यूज्ड केले आहे. किंवा या फोनला अपडेट किंवा रिपेअर करून त्याची वेबसाइट्सद्वारे विक्री केली जाते. अशा Used Mobile फोन स्मार्टफोन मॉडलला ओरिजनल किंमतीच्या किती तरी पट स्वस्त किंमतीत खरेदी करता येवू शकते. तुम्हाला जर सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच स्मार्टफोन विक्री करणाऱ्या खास वेबसाइट्स संबंधी माहिती या ठिकाणी देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स

​सेकंड हँड स्मार्टफोन्सचे फायदे

यूज्ड मोबाइल किंवा रिफर्बिश्ड स्मार्टफोनचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, या फोनला रियल किंमतीच्या किती तरी पट स्वस्तात खरेदी करता येते. उदारणासाठी जर तुम्हाला ५० हजार रुपये किंमतीचा आयफोन ११ खरेदी करायचा असेल तर सेकंड हँड किंमतीत हा आयफोन ११ तुम्हाला फक्त २० हजार रुपयाच्या किंमतीत मिळू शकतो. अनेकांना महागडा स्मार्टफोन खरेदी करायचा असतो परंतु, पुरेसे पैसे नसल्याने त्यांना ते शक्य होत नाही. त्यासाठी सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करण्याला अनेक जण प्राधान्य देत असतात. तसेच कुणाला तात्पुरती स्मार्टफोनची गरज असेल तर अशा लोकांसाठी सुद्धा सेकंड हँड स्मार्टफोन एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

वाचा: Ration Card Online: थेट घरी येईल रेशन कार्ड ,असा करा ऑनलाईन अर्ज, प्रोसेस आहे खूप सोपी

​Cashify

cashify

Refurbished Mobile किंवा Second Hand Smartphone खरेदी करायचा असेल तर कॅशीफाय या साइटवरून तुम्ही तो खरेदी करू शकता. ही वेबसाइट फोन खरेदी करताना ग्राहकांना आपल्या पसंतीचा मोबाइल ब्रँड आणि फेव्हरेट मोडल निवडण्याचे स्वातंत्र्य देते. अनेक फोन साइट्सवर उपलब्ध करते. या ठिकाणी सेकंड हँड फोन खरेदी करण्यासाठी ग्राहक आपला पसंतीचा स्मार्टफोन किंवा मॉडल खरेदी करू शकतो. या साइटवर रॅम आणि स्टोरेज सारखे ऑप्शन सुद्धा दिसतात. तसेच या साइट्सवर वेळोवेळी डिस्काउंट ऑफर्स सुद्धा दिली जाते. या साइट्स वरून फोन खरेदी करण्याआधी यासंबंधी आधीच सर्वकाही जाणून घ्या. त्यानंतरच फोन खरेदी करा.

वाचा: Charging Devices: तुमचा स्मार्टफोन १० वेळा चार्ज करू शकतात ५०००० mAh बॅटरीचे ‘हे’ मजबूत पॉवर बॅंक्स

​Amazon

amazon

ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया सुद्धा Renewed Smartphone च्या मार्केटमध्ये उतरली आहे. या ठिकाणी जुने अर्थात यूज्ड स्मार्ट फोन आपल्या प्लॅटफॉर्मवरून विक्री करीत आहे. यासाठी ग्राहकांना अमेझॉनने ‘Renewed’ नावाच्या सोबत एक वेगळे सेगमेंट तयार केले आहे. अमेझॉनवर सध्या अँड्रॉयड फोन्स खरेदी केले जावू शकते. परंतु, सेकंड हँड आयफोनला अजून या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले नाही. जर कुणाला सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी चांगली डील मिळू शकते.

वाचा: Smartphone Launch: iPhone सारखा दिसणारा स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत ८ हजार, फीचर्स दमदार, पाहा डिटेल्स

​OLX

olx

जुने आणि यूज्ड स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी भारतात सध्या जुने आणि विश्वासू नावापैकी एक नाव म्हणजे ओएलएक्स हे आहे. OLX ने खरं म्हणजे इंडियन मार्केटमध्ये त्यावेळी सुरुवात केली आहे ज्यावेळी सेकंड वस्तू खरेदी करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी खूप जास्त वेबसाइट्स नव्हत्या. किंवा अॅप उपलब्ध नव्हते. याचमुळे सेकंड हँड स्मार्टफोन्स Second Hand Smartphone खरेदी करण्यासाठी ओएलएक्सला अनेक जण प्राधान्य देत असतात. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी लोक डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. एकमेकांशी बोलून फोनची किंमत ठरवू शकतात.

वाचाः Facebook वर तुमची Friend Request कोणी स्विकारली नाही? या सोप्या ट्रिकने मिनिटात घ्या जाणून

​2Gud

2gud

टूगुड एक अशी वेबसाइट्स आहे. जी यूजर्संना सेकंड हँड स्मार्टफोन्स Second Hand Mobile phone खरेदी करण्याचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. या वेबसाइटला फ्लिपकार्टकडून बनवण्यात आले आहे. जुन्या फोनची विक्रीच नव्हे तर खरेदी करण्याची सुविधा या ठिकाणी मिळते. आता या वेबपेजला फ्लिपकार्टशी जोडले आहे. केवळ ओल्ड किंवा यूज्ड मोबाइल फोनच्या सेलवर फोकस करण्यासोबतच या ठिकाणी रिफर्बिश्ड प्रोडक्टच्या क्वॉलिटीवर विश्वास ठेवला जावू शकतो. जबरदस्त डिव्हाइस आणि स्वस्त किंमतीत फोन खरेदी करायचा असेल तर ग्राहकांना जुना फोन खरेदी करण्यासाठी हा एक ऑप्शन ठरू शकतो.

वाचाः भारतातील टॉप १० सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स, किंमत १४,९९९ रुपयांपासून सुरू

​Yaantra

yaantra

यांत्रा डॉट कॉम सुद्धा यूज्ड मोबाइल यूजर्संना खरेदी करण्यासाठी तसेच विकण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. या वेबसाइटवर विविध ब्रँड्स आणि मॉडल सेलसाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या बेजटनुसार, तुम्ही या ठिकाणी सेकंड हँड फोन खरेदी करू शकता. Refurbished Smartphone ची चांगली क्वॉलिटी देण्याबरोबरच या ठिकाणी यूजर्सला डील्स आणि डिस्काउंट सुद्धा दिले जाते. याशिवाय, Yaantra.com एक जबरदस्त प्वॉइंट हा सुद्धा आहे की, सेकंड हँड स्मार्टफोन्सवर Second Hand Mobile phone वर या ठिकाणी वॉरंटी मिळते.

वाचाः मस्तच ! या प्लानमध्ये ८० दिवसांपर्यंत रोज मिळणार १ GB डेटा, डेली खर्च ५ रुपये, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here