नवी दिल्लीः प्रसिद्ध व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप ‘झूम’ ‘हे सुरक्षित नाही. त्यामुळे, त्याचा वापर करताना सावधगिरी बाळगा,’ असा इशारा केंद्रीय गृह मंत्रालयाने दिला आहे. तसेच अमेरिकेसह अनेक देशात झूम अॅपवर बंदी घातली आहे. गुगलनेही आपल्या कर्मचाऱ्यांना झूम अॅपचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे झूम अॅपचा वापर अनेकांनी टाळला आहे. त्यामुळे झूम अॅप नाही तर मग कोणता व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅप चांगला आहे. ज्याने मीटिंग चांगली होवू शकते.

वाचाः

मायक्रोसॉफ्ट स्काइप मध्ये मीट नाऊ अॅप वरून आरामात व्हिडिओ कॉलिंग करू शकतो. मीट नाऊ चा फायदा हा आहे की, या वरून ज्यांच्याकडे स्काइपचे अकाउंट नाही, ते लोकही व्हिडिओ कॉलिंग करू शकतात. यात कॉल रेकॉर्डिंग, म्युट आणि अनम्युट मायक्रोफोन यासारखे फीचर्च देण्यात आले आहेत. यावर तुम्ही ३० दिवसांपर्यंत रिकॉर्डिंग करू शकता. यावरून प्रेझेटेंशनही देऊ शकता.

गुगल मीटला आधी हँगआऊट मीट नावाने ओळखले जात असत. परंतु, आता याचे नाव गुगल मीट ठेवले आहे. यात एकाचवेळी ४९ लोक सहभागी होऊ शकतात. जी सूट इंटरप्राइज युजर्स एकाचवेळी २५० लोकांसोबत मीटिंग करू शकतात.

वेब एक्सवर एकाचवेळी ५० ते १०० लोकांसोबत व्हिडिओ कॉलिंग केली जावू शकते. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात व्हिडिओ कॉलिंगसाठी अनलिमिटेड वेळ मिळते.

स्टारलीफ वरूनही सहज व्हिडिओ मीटिंग केली जाऊ शकते. स्टारलीफ अॅपवर जास्तीत जास्त २० लोकांना व्हिडिओ कॉलिंमध्ये सहभागी करता येवू शकते. या अॅपसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.

Jitsi Meet
एक ओपन सोर्स प्रोजेक्ट आहे. यावरून जास्तीत जास्त ७५ जणांना व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग करता येवू शकते. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात बॅकग्राऊंडला ब्लर करण्याची सुविधा आहे. यात स्लॅक, गुगल कॅलेंडर आणि ऑफिस ३६५ चा सपोर्ट दिला आहे.

Whereby
याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला नवीन अॅप डाउनलोड करायचे नाही. किंवा नवीन लॉग इन करायचे नाही. फोनच्या ब्राऊझरमध्ये whereby.com टाइप करून व्हिडिओ कॉलिंग करता येवू शकते. यात ५० लोकांना एकत्र मीटिंग करता येवू शकते.

सिग्नल एक सुरक्षित मीटिंग अॅप आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यावर एडवर्ड स्नोडेन विश्वास ठेवतात. हे एक फ्री अॅप आहे. यात स्क्रेच, क्रॉप, फ्लिप आणि अन्य इमेज एडिटिंग फीचर्स आहेत.

Microsoft Meet
मायक्रोसॉफ्ट मीटवरून तुम्ही २५० लोकांसोबत मीटिंग करू शकता. यात मीटिंग शेड्यूल्ड करू शकता.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here