नवी दिल्लीः रिलायन्स कंपनीने लॉकडाऊनमध्ये आपल्या ग्राहकांना एक आणखी आनंदाची बातमी दिली आहे. जिओच्या ग्राहकांना आता ३ मे पर्यंत इनकमिंग कॉलसाठी कोणतेही रिचार्ज करण्याची गरज नाही. तसेच कंपनीने आपल्या प्रीपेड सेवेचे वैधता वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे.

वाचाः

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना गुड न्यूज दिली असताना सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी ५ मे पर्यंत इनकमिंग कॉल्सची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. याआधी भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांनी ही सुविधा देण्याची घोषणा केली होती. याशिवाय या चारही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी घरी बसून रिचार्ज करण्याची सुविधा दिली आहे.

वाचाः

इनकमिंग कॉलची सुविधा

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान, ज्या युजर्सच्या अकाउंटची वैधता संपणार आहे. त्यांच्या प्लानची वैधता ५ मे २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व ग्राहकांना ५ मे पर्यंत इनकमिंग कॉलची सुविधा मिळणार आहे. यासाठी त्यांना कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. त्यांच्या फोनवर इनकमिंग कॉल येणे सुरूच राहिल.

टोल फ्री हेल्पलाइनवरून करू शकता रिचार्ज

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना रिचार्ज करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. सध्या ही सुविधा उत्तर आणि पश्चिम क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आहे. तर दक्षिण आणि पूर्व क्षेत्रासाठी ही सुविधा २२ एप्रिलपासून म्हणजे आजपासून उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here