नवी दिल्लीः लॉकडाऊनमध्ये नव-नवीन फीचर्स आणणाऱ्या ने आपल्या युजर्संसाठी आणखी एक नवीन फीचर्स लाँच केले आहे. WhatsApp ने टुगेदर अॅट होम चे स्टीकर पॅक लाँच केले आहे. यासाठी कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेसोबत हात मिळवणी केली आहे. या स्टीकरच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये आपल्या भावनांना वाट मोकळी करून देता येणार आहे. पॅकचे स्टीकर्स इंग्रजी भाषेला सपोर्ट करतात. परंतु, लवकरच कंपनी स्टीकर्सला अन्य भाषेत लाँच करण्याची शक्यता आहे.

वाचाः

WhatsAppचे नवीन स्टीकर पॅक

व्हॉट्सअॅपचे हे स्टीकर पॅक खूप मजेशीर आहे. युजर्संना या पॅकमधून आपल्या भावना मोकळ्या करता येणार आहेत. या पॅकमधील एक स्टीकरमध्ये व्यक्ती लॅपटॉपसोबत दाखवण्यात आला आहे. जो वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहे.

व्हिडिओ कॉलमध्येही नवे फीचर
whatsapp व्हर्जन २.२०.१०८ मध्ये आता सरळ कोणत्याही ग्रुपवर व्हिडिओ कॉल कनेक्ट करू शकता. जर ग्रुपमध्ये चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्या सर्वांना वेगवेगळे व्हिडिओ कॉल करण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपच्या या ग्रुप अपडेट कॉलमध्ये कॉलिंग साठी एक नवीन पर्याय दिला आहे. आता ग्रुप चॅटच्या वरच्या भागात व्हिडिओ कॉल आयकॉनवर टॅप करून जास्तीत जास्त चार व्यक्तींना एकाचवेळी व्हिडिओ कॉल करता येवू शकतो. विशेष म्हणजे कॉल करण्यासाठी वेगवेगळे व्यक्तींना निवडण्याची गरज नाही. नवीन फीचरने ग्रुपमधील सर्व सदस्यांना (जास्तीत जास्त ४) एकाचवेळी कॉल करता येईल.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here