नवी दिल्लीः नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ने एक मस्त ऑफर आणली आहे. कंपनीने एचडी आणि एसडी बॉक्सच्या किंमतीत १०० रुपयांची कपात केली आहे. ही कपात केल्यानंतर एचडी बॉक्सची किंमत १५९९ रुपये आणि एसडी बॉक्सची किंमत १४९९ रुपये झाली आहे. सेट-टॉप बॉक्सची किंमत कमी करण्याबरोबरच कंपनी नवीन युजर्संना खास जॉइनिंग बोनस देत आहे.

वाचाः

टाटा स्काय आणि डीटूएच ची किंमत समान

किंमत कमी केल्यानंतर टाटा स्काय आणि D2hच्या एचडी बॉक्सची किंमत आता समान झाली आहे. टाटा स्कायने आपल्या HD आणि SD बॉक्सची एकच किंमत म्हणजे १४९९ ऑफर केली आहे. सध्या मार्केटमध्ये सर्वात जास्त डीटीएच बॉक्स केवळ एअरटेलचा डिजिटच टीव्ही आहे. याच्या एचडी बॉक्सची किंमत १३०० रुपये आणि एसडी बॉक्सची किंमत ११०० रुपये आहे.

वाचाः

D2h युजर्संना जॉइनिंग बोनस

एअरटेल डिजिटल टीव्ही आणि टाटा स्काय स्वस्त सेट -टॉप बॉक्स ऑफर करीत असले तरी यात सब्सक्रिप्शन किंमतीचा समावेश नाही. यात D2h टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्हीच्या पुढे आहे. कंपनी युजर्संना खास जॉइनिंग बोनस दित आहे.

दुसरीकडे डीटीएच कंपनी, एअरटेल, टाटा स्काय, किंवा सन डायरेक्टर आपल्या युजर्संना कोणतीही जॉइनिंग बोनस देत नाही. डीटूएच आपल्या युजर्संना एका महिन्याचे गोल्ड पॅकेजचे सब्सक्रिप्शन देत आहे. गोल्ड पॅकेजची किंमत विना जीएसटी २७५ रुपये महिना इतकी आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here