never keep phone in your back pocket : रस्त्यांवरून जात असताना आपल्या समोर असलेल्या व्यक्तीच्या मागच्या खिशात ठेवलेला स्मार्टफोन आपल्याला बऱ्याच वेळा दिसला असेल. अनेक जण असा मोबाइल बिनदिक्तपणे ठेवतात. विशेषतः मुलीच्या जिन्स पँटच्या मागील खिशात असा मोबाइल हमखास ठेवलेला असतो. परंतु, असा मागच्या खिशात मोबाइल ठेवणे खरंच, धोकादायक आहे का?, मागच्या खिशात असा फोन का ठेवू नये, याची या ठिकाणी ५ महत्त्वाची कारणं दिली आहेत. सध्या गर्दीच्या वर्दळीत आपण मागच्या खिशात ठेवलेला फोन हमखात पाहत असतो. यात मुलांसोबत मुलीचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या ठिकाणी फोन ठेवणे सोपे असले तरी ते शरीराला आणि फोनला नुकसान पोहोचवणारे आहे. याचा एकच फायदा म्हणजे पॉकेट थोडे टाइट असल्याने फोन त्या ठिकाणी फिट बसतो. परंतु, असं करणं धोकादायक ठरू शकतं. आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला पाठीमागच्या खिशात फोन ठेवल्यास होणाऱ्यापासून नुकसानाची माहिती देत आहोत, जाणून घ्या.

​काहीही होवू शकते डायल

पँटच्या मागील बाजुस फोन ठेवल्याने फोन आपोआप डायल होवू शकतो. कारण, पँट फिट असते. जिन्स असल्याने ती आणखी टाइट असते. अशावेळी पासवर्ड जर नसेल तर कोणताही नंबर डायल होवू शकतो. जर तुमच्या फोनला पॅटर्न किंवा ऑन होण्याच्या तक्रारी अनेकांकडून करण्यात आल्या आहेत. जर पासवर्ड असेल तर पॉवर बटन दबून डिस्प्ले ऑन होवू शकतो. तसेच इमरजन्सी नंबर सुद्धा डायल होवू शकतो.

वाचा: Upcoming Smartphones: Motorola चा नवीन स्मार्टफोन भारतात करणार धमाकेदार एंट्री, मिळेल २०० मेगापिक्सलचा कॅमेरा

​पार्श्वभागात होऊ शकते समस्या

घट्ट घातलेल्या जिन्सच्या मागील पॉकेटमध्ये मोबाइल ठेवल्यास काही समस्या उद्धवू शकतात. यासंबंधी बोलताना न्यूमेरोलॉजिस्ट आणि मेडिकल सल्लागार फॉर कस्टमर रिपोर्ट आर्ले अवितजर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून अशा रुग्णांची संख्या खूप वाढत आहे. अनेकांना पँटच्या मागच्या खिशात फोन ठेवल्याने पार्श्वभागात समस्या जाणवत आहे. तसेच अनेकांना पायातील टाचाचा त्रास सुद्धा होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या सेलफोनला मागील पॉकेटमध्ये ठेवल्याने होत आहे.

वाचा: Nothing phone (1) बाबत मोठा खुलासा, फोनमध्ये असेल Snapdragon 778G+ चिपसेट, पाहा डिटेल्स

​फोनला होऊ शकते नुकसान

काही तरुण – तरुणी आपला महागडा स्मार्टफोन सतत मागच्या खिशात ठेवतात. आधीच पँट फिट असल्याने हा फोन आणखी फिट बसतो. त्यामुळे फोनला यामुळे नुकसान होवू शकते. आयफोन ६ च्या लाँचिंग वेळी अशी माहिती समोर आली होती की, फोन बँड होण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. फोनची साइज मोठी होती. तसेच तो सतत मागे ठेवला जात असल्याने बँड होत होता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सतत मागे ठेवल्यानंतर अनेक जण बसताना तो फोन काढायचे विसरतात. यामुळे फोनला नुकसान होऊ शकते. बँड होवू शकतो तसेच फोनला अन्य नुकसान होऊ शकते.

वाचाः नवीन SIM Card खरेदी करतांना चुकूनही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा होईल मोठे नुकसान

​चोरी होण्याची भीती

मुंबई, पुणे सारख्या गजबजलेल्या शहरात अनेक तरुण मुलं मुली आपला महागडा मोबाइल फोन पँटच्या मागच्या खिशात ठेवत असतात. अनेक जण टी शर्ट घालत असल्याने टीशर्टला खिसा नसल्याने ते आपल्या पँटच्या मागच्या खिशात महागडा स्मार्टफोन ठेवत असतात. परंतु, असे करणे म्हणजे चोराला फोन चोरी करू देण्याची संधी देण्यासारखे आहे. कारण, अनेकदा लोकल प्रवासात किंवा बस प्रवासात चोर मागील खिशातून फोन अलगद चोरी करतात. गर्दीचा फायदा घेत ते मोबाइल लंपास करतात. अनेकांना फोन चारी झाल्याचे तात्काळ लक्षात येत सुद्धा नाही.

वाचाः Memory Card मधून डिलीट झालेले फोटो ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने सहज होतील रिकव्हर

​फोन पडण्याची भीती

जीन्स पँटचा मागील खिशा टाइट असला तरी अनेकदा धावत असताना किंवा फास्ट चालत असताना फोन खाली पडण्याची भीती असते. धावत बस पकडणे, लोकल पकडताना अनेकदा मागील खिशातील फोन पडलेले आहेत. त्यामुळे मागच्या खिशात फोनला ठेवणे हे धोकादायकच आहे. बॅगेत किंवा वरच्या खिशात फोन ठेवणे हे मागील खिशात ठेवण्याच्या तुलनेत जास्त सुरक्षित आहे. तसेच चोरी होण्याची भीती सुद्धा त्या तुलनेत कमी आहे. फोन पडण्याची भीती सुद्धा कमी आहे. त्यामुळे तुमचा महागडा स्मार्टफोन असेल तर तो मागील खिशात ठेवण्याआधी या सर्व गोष्टींचा विचार केल्यास तुम्हाला फायदा होईल.

वाचाः फोनवर स्क्रॅच पडले आहेत? ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने मिनिटात हटवा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here