Tips To Repair Micro sd Card: मायक्रोएसडी कार्ड हे डेटा सेव्ह करण्याचे सर्वोत्तम माध्यम मानले जाते. या डिव्हाईसची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सहज डेटा ट्रान्सफर करू शकता. फक्त एका फोनमधून कार्ड काढून दुसऱ्या फोनमध्ये ठेवले.की तुमचे काम होते. इंटरनेट आणि कम्प्युटरचा त्रास नाही. यामुळेच लोक मेमरी कार्डमध्ये सर्वात जास्त वापरत असलेला Data ठेवण्यास प्राधान्य देतात. परंतु, कधी-कधी असे होते की समस्या मायक्रोएसडी कार्डपासून सुरू होते. कधी तेआयडेंटिफाय होत नाही.तर, कधी फाईल उघडू देत नाही. अशा परिस्थितीत, कार्ड खराब झाले आहे असे तुम्हाला वाटते आणि नवीन कार्ड घेण्याचा विचार करता. पण, येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मेमरी कार्ड लवकर खराब होत नाही आणि थोडीशी अडचण आली तरी तुम्ही ती सहज सोडवू शकता, यासाठी काही सोप्प्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

Mobile Repair

mobile-repair

मोबाईल वरून दुरुस्ती: जर तुमच्याकडे पीसी नसेल, तर तुम्ही तुमचे कार्ड मोबाईलवरूनही दुरुस्त करू शकता आणि येथे Disk Digger अॅप देखील तुम्हाला मदत करेल. जर तुमचा फोन रूट केलेला असेल तर हे अॅप अधिक चांगले काम करेल अन्यथा रूट नसलेल्या फोनसाठी तुम्ही डिस्कडिगर Pro version वापरू शकता.

फॉरमॅट : जर तुम्ही डेटाचा बॅकअप घेतला असेल आणि सर्व ट्रिक्स वापरून पाहिल्यानंतर, मेमरी कार्डमध्ये समस्या येत असेल, तर ते अधिक चांगले फॉरमॅट करा. हे पूर्णपणे नवीन पद्धतीने काम करेल. तुमच्या PCशी कनेक्ट करा आणि फॅट 32 वर फॉरमॅट करा.

वाचा :Reliance Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान्स, सुरुवातीची किंमत १४९ रुपये, प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलसह भरपूर डेटा

Install Software

install-software

डिस्कडिगर सॉफ्टवेअरसह कार्ड दुरुस्त करण्यासाठी, प्रथम तुमच्या PC वर install करा आणि नंतर प्रोग्राम सुरू करा. येथे तुम्हाला डिव्हाइस निवडीचा पर्याय मिळेल, तुम्हाला मायक्रोएसडी कार्ड निवडावे लागेल. तुम्हाला नेक्स्ट-नेक्स्ट तीन वेळा करावे लागेल आणि हे सॉफ्टवेअर तुमचे कार्ड स्कॅन करेल. यास थोडा वेळ लागेल. परंतु, काही वेळात सर्व फाईल्स तुमच्या कार्डमध्ये दिसतील. इच्छित असल्यास, आपण तेथून फाइल कॉपी करू शकता आणि ती कुठेही ठेवू शकता. आणि कार्ड नीट काम करत आहे की नाही ते पाहू शकता.

वाचा: Oppo Reno 8 series चे भारतात लॉंचिंग कन्फर्म, एकाच वेळी २ फोन्स करतील एन्ट्री, पाहा काय असेल खास

Software Repair

software-repair

जर फाइल दिसत नसेल तर सॉफ्टवेअरने दुरुस्त करा : जर तुम्हाला फाईल दिसत नसेल आणि वरील पद्धती मदत करत नसेल तर तुम्ही सॉफ्टवेअरची मदत घेऊ शकता. डिस्क डिगर हे उत्तम सॉफ्टवेअर आहे. त्याची चाचणी आवृत्ती विनामूल्य उपलब्ध आहे तर सशुल्क आवृत्तीसह अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कार्ड दुरुस्तीसह डिलीट केलेला आणि खराब झालेला डेटा दुरुस्त करण्यास सक्षम आहे. ही ट्रिक खूप कामांची आहे.

वाचा: Smartphone Tips: Memory Card मधून डिलीट झालेले फोटो ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने सहज होतील रिकव्हर

Laptop Repair

laptop-repair

लॅपटॉपमध्ये कार्ड टाकत असाल आणि ते दाखवत नसेल तर, यासाठी सर्वप्रथम, तुमच्या संगणकावरील सिस्टम मॅनेजरमध्ये फोन उघडा. यानंतर तुम्हाला डिस्क मॅनेजमेंटवर क्लिक करावे लागेल. जर तुमच्याकडे Windows 10 असेल, तर My PC वर राइट-क्लिक केल्यास मॅनेजचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीवर उपलब्ध असलेल्या सर्व डिस्कची यादी डाव्या बाजूला येईल. उजव्या बाजूला तुम्हाला एक microSD कार्ड दिसेल. त्यावर राईट क्लिक करा. तुम्हाला Change Drive Letter and Path चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. नवीन विंडोज उघडेल आणि तुम्हाला त्यात Add चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून जेव्हा तुम्ही My PC वर जाल तेव्हा तुम्हाला microSD कार्ड दिसेल.

वाचा: Best Plans: ‘हा’ प्लान आहे जबरदस्त, एकाच रिचार्जवर चालणार घरातील चार जणांचा फोन, सोबत डेटा आणि OTT बेनेफिट्स सुद्धा

Windows Repair

windows-repair

कधी- कधी असे होते की मेमरी कार्ड कम्प्युटर आणि मोबाईलमध्ये प्लग इन केले असलेले तरी दिसत नाही. अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुमचे कार्ड संगणक किंवा लॅपटॉपमध्ये ठेवा. जर कार्ड दिसत असेल आणि ते काम करत नसेल तर, कर्सर हलवून प्रथम कार्डवर राईट क्लिक करा. येथे तुम्हाला Explore चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला खाली Properties चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला टूल्स नावाचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा आणि Check Now Error वर क्लिक करा. कार्डमध्ये काही किरकोळ समस्या असल्यास, तुमचा पीसी स्वतःच त्याचे निराकरण करेल. यानंतर तुम्ही कार्डमध्ये उपलब्ध डेटा ऍक्सेस करू शकाल.

वाचा: नवीन घरी शिफ्ट झाला असाल तर ‘असा’ करा Aadhaar Card मध्ये Address अपडेट, घर बसल्या होईल काम

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here