दावा

सोशल मीडियावरील अनेक युजर्स आणि व्हॉट्सअॅप युजर्संनी एक पत्र शेअर केले आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, करोना व्हायरसच्या महामारीमुळे देशातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट बंद राहणार आहेत.

मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले पत्र खरे वाटावे म्हणून या पत्रावर पर्यटन मंत्रालयाचा लोगो सुद्धा दिसत आहे.

या ठिकाणी पाहा पत्र

‘टाइम्स ‘च्या एका वाचकाने आमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हे पत्र पाठवून याची खरी माहिती जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे ?

हे पत्र खोटे आहे. पर्यटन मंत्रालयाने करोना व्हायरसमुळे १५ ऑक्टोबर पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट बंद करण्यासंबंधीची कोणतीही नोटीस जारी केली नाही.

मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले की, हे एक फेक पत्र आहे. ज्यात मंत्रालयाने माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. करोना व्हायरसमुळे हॉटेल, रेस्टॉरेंट, रिसॉर्ट १५ ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहेत, असा दावा या पत्रातून करण्यात आला आहे. त्यामुळे हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. टूरिझम क्षेत्रातील लोक आधीच भयभयीत झाले आहेत. पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले की, असे कोणतेही पत्र जारी करण्यात आले नाही. लोकांनी खोट्या पत्रावर व दाव्यावर विश्वास ठेवू नये.

टाइम्स फॅक्ट चेकने गुगलवर अनेक की वर्ड्स सर्च केले. परंतु, आम्हाला मीडियाची अशी कोणतीही बातमी मिळाली नाही. ज्यात हॉटेल, रेस्टॉरेंट आणि रिसॉर्ट बंद करण्याचा दावा करण्यात आला. आम्हाला ‘पीआयबी’च्या फॅक्ट चेक ट्विटर हँडलवरून करण्यात आलेले एक ट्विट मिळाले. ज्यात हा दावा फेटाळला होता. या ट्विटच्या माहितीनुसार, हा आदेश फेक आहे. पर्यटन मंत्रालयाने या प्रकारचा कोणताही आदेश जारी केला नाही.

निष्कर्ष
करोना व्हायरसमुळे देशातील हॉटेल, रिसॉर्ट आणि रेस्टॉरेंट १५ ऑक्टोबर पर्यंत बंद करण्यात येणार असल्याचा दावा खोटा आहे. हा आदेश पर्यटन मंत्रालयाने जारी केलेला नाही, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here