भारतीय मोबाइल यूजर्संना जर विचारले की, मोबाइल रिचार्ज प्लान संबंधी तुमची सर्वात पहिली डिमांड कोणती आहे. तर ते म्हणतील की मोबाइल रिचार्ज हे स्वस्त असायला हवेत. भारतात स्मार्टफोन चालवताना यूजर्संना कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त बेनिफिट्स कसे मिळतील. तसेच या प्लानमध्ये जास्त वैधता आणि भरपूर इंटरनेट डेटा कसा मिळेल. यासाठी यूजर्सचा प्रयत्न असतो. देशातील खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या टॅरिफ प्लानच्या किंमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत आता जास्त महाग झाले आहेत. कंपन्या आपल्या प्लान्समध्ये २८ दिवसाची वैधता देत आहे. जिओ एअरटेल आणि व्हीआयच्या महागड्या प्लान्सदरम्यान, देशाची सरकारी टेलिकॉम कंपनी १५१ रुपयाचा प्लान घेऊन आली आहे. या प्लानमध्ये यूजर्संना रोज २ जीबी डेटा आणि ३० दिवसाची वैधता दिली जात आहे. जाणून घ्या डिटेल्स.

​MTNL 151 Plan

mtnl-151-plan

१५१ रुपयाचा हा प्लान एमटीएनएलचा म्हणजेच महानगर टेलिकॉम निगम लिमिटेडने आणला आहे. या प्लानमध्ये तुम्हाला सर्वकाही मिळते. प्लानची किंमत खूपच कमी आहे. याला स्वस्त किंमतीत एका महिन्यासाठी वैधता दिली जाते. तसेच या रिचार्ज प्लानमध्ये डेली इंटरनेट डेटा सुद्धा दिला जातो. संपूर्ण देशात अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. MTNL 151 Plan मध्ये यूजर्संना अन्य प्लानच्या तुलनेत जबरदस्त बेनिफिट्स मिळतात.

वाचाः मस्तच! Reliance Jio मोफत देत आहे २ हजार रुपयांचे रिचार्ज, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

​30 days validity

30-days-validity

महिन्यात संपूर्ण ३० दिवसाची वैधता या प्लानमध्ये मिळते. भारतीय मोबाइल फोन यूजर्सला इतकी मोठी वैधता अन्य प्लानच्या तुलनेत मिळत नाही. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या तिन्ही कंपन्यांनी ट्रायच्या दणक्यानंतर काही निवडक मंथली प्लान आणले आहेत. परंतु, अजूनही सर्रासपणे जास्तीत जास्त प्लानमध्ये एक महिन्याऐवजी फक्त २८ दिवसाची वैधता दिली जात आहे. तर एमटीएनएलचा हा १५१ रुपयाचा प्लान ३० दिवसाची वैधते सोबत येतो. ज्यात मोबाइल यूजर पूर्ण १ महिन्याचा फायदा घेवू शकतो.

वाचा: Noise ColorFit Pro 2 ते BoAt Xtend ‘या’ आहेत स्वस्तात मस्त स्मार्टवॉचेस, किंमत ३,००० पेक्षा कमी

​Daily 2GB data

daily-2gb-data

या प्लानमध्ये ३० दिवसाच्या वैधते सोबत या प्लानची दुसरे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात मिळणारे इंटरनेट डेटा आहे. एमटीएनएलचा १५१ रुपयाच्या प्लानमध्ये कंपनी यूजर्संना रोज २ जीबी डेटा देत आहे. रोज २ जीबी डेटा या हिशोबाप्रमाणे एनटीएनएल ग्राहक संपूर्ण महिन्यात एकूण ६० जीबी डेटा मिळवू शकतो. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कोणत्याही कंपनीकडे सध्या १५१ रुपयात पूर्ण महिन्यासाठी ६० जीबी डेटा देण्याची ताकद नाही.

वाचा: Upcoming Smartphones: OnePlus 10 RT मध्ये मिळू शकतात ‘हे’ भन्नाट फीचर्स, लवकरच होऊ शकतो फोन लाँच

​Unlimited Calls

unlimited-calls

या प्लानमध्ये संपूर्ण महिन्यासाठी ३० दिवसाची वैधता आणि रोज २ जीबी डेटा सोबत १५१ रुपयाच्या एमटीएनएलच्या प्लान यूजर्सला फुल कॉलिंग बेनिफिट सुद्धा मिळते. या प्लान अंतर्गत ग्राहकांना पूर्ण महिन्यासाठी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग प्लस लोकल प्लस एसटीडी कॉलिंग मिळते. याचा यूज ऑन नेट तसेच ऑफ नेट दोन्हीवर केला जावू शकतो. या प्लानमध्ये यूजर्संना १०० एसएमएस प्रति रोज याप्रमाणे मिळतात.

वाचा: Validity Plans: १ वर्ष रिचार्जची काळजी नाही, Jio च्या ‘या’ प्लानमध्ये लॉंग टर्म व्हॅलिडिटी, ७३० GB डेटासह मिळताहेत ‘या’ सर्व्हिसेस

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here