तुम्ही जर पॉवर कटची समस्या असलेल्या ठिकाणी राहत असाल. तर, स्मार्टफोन सतत चार्ज करणे शक्य होत नाही. अशात चांगली आणि मजबूत बॅटरी असलेला स्मार्टफोन तुमच्या कामी येऊ शकतो. तुमच्यासाठी ७००० mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन खरेदी करणे हा एक चांगला निर्णय असेल, कारण जास्त mAh बॅटरी अधिक दिवसांचा पॉवरबॅक देते. सध्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये ४५०० mAh किंवा ५००० mAh बॅटरी दिली जाते. जुन्या स्मार्टफोनच्या खराब बॅटरी बॅकअप मुळे चिंतेत असाल तर आता तुमचे टेन्शन कायमचे दूर होणार आहे.आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेतील ७००० mAh बॅटरी असलेल्या सर्वात स्वस्त फोनबद्दल सांगणार आहोत. ७००० mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोन्सची ही लिस्ट पाहा आणि खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन. लिस्टमध्ये Tecno Pova 3, सॅमसंग गॅलेक्सी F62, Samsung Galaxy M62 सारख्या फोन्सचा समावेश आहे

Samsung Galaxy M 51

samsung-galaxy-m-51

Samsung Galaxy M51 मध्ये ६.७ -इंचाचा डिस्प्ले आहे. फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन Android 11 वर आधारित Samsung च्या One UI वर काम करतो. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M51 च्या मागील बाजूस ४ कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा आहे. फोनच्या फ्रंटमध्ये ३२ -मेगापिक्सलचा पिन होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ३२ MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये ७००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

वाचा: UPI पिन बदलण्याची खूपच सोपी पद्धत, अवघ्या २ मिनिटात बदला PIN

Samsung Galaxy M62

samsung-galaxy-m62

Samsung Galaxy M62: यात ६.७ -इंचाचा फुल-एचडी + सुपर AMOLED प्लस डिस्प्ले आहे. फोन Exynos 9825 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये ७००० mAh बॅटरी आहे. ज्यामध्ये २५ W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हा फोन ड्युअल सिम असून यात १२८ GB इंटरनल मेमरी आहे. फोनच्या मागील बाजूस ४ कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये प्राथमिक कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा आहे. एक कॅमेरा १२ मेगापिक्सेलचा आणि २ कॅमेरे ५-५ मेगापिक्सेलचे आहेत. फोनमध्ये फास्ट चार्जिंगसाठी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे.

Tecno Pova 2

tecno-pova-2

फोनमध्ये ६.९ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. फोन Octa-core MediaTek Helio G88 सपोर्टसह येतो. फोनमध्ये ७००० mAh बॅटरी युनिट आहे. जे, ३३ W फास्ट चार्जिंगसह येते. फोनच्या मागील पॅनलवर क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ४८ MP प्रायमरी कॅमेरा, २ MP मॅक्रो कॅमेरा, २ MP खोली आणि २ MP AI कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी ८ MP फ्रंट कॅमेरा आहे.. हा फोन Android 12 वर आधारित HiOS 8.6 वर चालतो. हा बजेट स्मार्टफोन १८० Hz टच रिस्पॉन्सिव्ह रेट आणि २० .५:९ आस्पेक्ट रेशोसह ६.९ -इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले दाखवतो.

वाचा : आता Nothing Phone (1) ची किंमत आली समोर, मोजावे लागतील ‘इतके’ पैसे, पाहा डिटेल्स

Samsung Galaxy F62

samsung-galaxy-f62

फोनमध्ये ६.७ -इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोन Exynos 9825 प्रोसेसर सपोर्टसह येतो. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याचा, प्राथमिक सेन्सर ६४ मेगापिक्सेल आहे. दुसरा १२ मेगापिक्सेल, तिसरा ५ मेगापिक्सेल आणि चौथा ५ मेगापिक्सेलचा आहे. त्याच वेळी, समोर ३२ मेगापिक्सलचा सेन्सर आहे.यात ७००० mAh बॅटरी आहे. यात ६ GB RAM आणि १२८ GB इंटर्नल स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे १ TB पर्यंत वाढवता येते.

वाचा: Validity Plans: १ वर्ष रिचार्जची काळजी नाही, Jio च्या ‘या’ प्लानमध्ये लॉंग टर्म व्हॅलिडिटी, ७३० GB डेटासह मिळताहेत ‘या’ सर्व्हिसेस

Tecno Pova 3

tecno-pova-3

Tecno Pova 3 मध्ये ७००० mAh बॅटरी आहे. फोनला ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.९ -इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. यात Octa Core Helio G88 प्रोसेसर सपोर्ट मिळेल. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. त्याचा मुख्य कॅमेरा ५० MP असेल. सेल्फी कॅमेरा सेटअप ठेवण्यासाठी पंच होल कटआउट डिझाइन सुद्धा दिली आहे. हुड अंतर्गत Tecno Pova 3 मध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर, माली G52 GPU, 6GB LPDDR4X रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज सोबत जोडले आहे.

वाचा How to Protect Passport: तुमच्याकडे Passport असेल तर ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकते नुकसान, पाहा टिप्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here