नवी दिल्लीः फेसबुकची मालकी असलेल्या चे जगभरात दोन अब्ज हून अधिक जास्त युजर्स आहेत. २०१८ पासून बातम्या येत आहे की, फेसबुक लवकरच व्हॉट्सअॅपवर घेऊन येण्याची तयारी करीत आहे. या जाहिराती स्टेट्सवर दिसतील. परंतु, फेसबुकने या संदर्भात अद्याप काहीही माहिती दिली नाही.

वाचाः

द इन्फर्मेशन ने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले की, फेसबुक लवकरच आपल्या व्हॉट्सअॅपवर जाहिराती दाखवण्याची सुरुवात करणार आहे. परंतु, या रिपोर्टमध्ये जाहिराती दाखवण्याच्या तारीखचा उल्लेख करण्यात आला नाही. व्हॉट्सअॅप अँड टू अँड एंक्रिप्टेड म्हणजेच व्हॉट्सअॅपवर होत असलेल्या चॅटिंग संदर्भात कोणतीही माहिती फेसबुककडे नाही. परंतु, मग व्हॉट्सअॅपवर अँड टू अँड एंक्रिप्टेड आहेत तर लक्ष्य गाठण्याासाठी जाहिराती कशा दाखवता येतील, असा प्रश्न पडतो. रिपोर्ट मध्ये म्हटले की, फेसबुकने ही समस्या मार्गी लावली आहे. फेसबुक व्हॉट्सअॅपवर जाहिराती युजर्संच्या फेसबुकच्या अकाउंटच्या आधारावरून दाखवणार आहे. त्यामुळे फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या दोन्ही सोशल मीडियाचा वापर किती लोक करतात, याचा डेटा फेसबुक काढत असल्याची माहिती आहे.

वाचाः

कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही युजर्स आपले फेसबुक अकाउंला डिलिट करू शकतात. व्हॉट्सअॅपवर जाहिराती दाखवण्यावरून याआधी वाद उभा राहिला होता. २०१८ मध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅप स्टेट्स मध्ये जाहिरात दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here