know what to do when phone falls in water: पावसाळा सुरू झाला असून, या काळात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात, स्मार्टफोन, लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सला या काळात सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाच्या पाण्यात स्मार्टफोन भिजल्यास फोन (what to do if phone gets wet) खराब होऊ शकतो. तुम्ही जर कामानिमित्त सतत बाहेर प्रवास करत असाल तर अशा स्थितीमध्ये फोनची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात डिव्हाइसला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही Waterproof Pouch चा वापर करू शकता. तसेच, प्रवास करताना अचानक पाऊस आल्यास फोनला पॉलिबॅग आणि पेपरने झाकून सुरक्षित करू शकता. एवढे सगळे केल्यानंतरही जर फोनमध्ये पाणी गेल्यास काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने फोनमध्ये पाणी गेल्यावरही तुम्ही फोनला सुरक्षित ठेवू शकता. या टिप्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​फोन त्वरित करा स्विच ऑफ

अनेकदा बाहेर गेल्यावर अचानक पाऊस सुरू होतो व अशावेळी हँडसेटला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याकडे काहीही नसते. त्यामुळे मोबाइल पाण्यामध्ये भिजल्यास अथवा त्यात पाणी गेल्यास डिव्हाइसला त्वरित स्विच ऑफ करा. फोनला पुन्हा स्विच ऑन करण्याची चूक करू नका. पाण्याचा एक थेंबही फोनमध्ये गेल्यास यातील चिपमधील सर्किट्स खराब होऊ शकतात. तुमच्या फोनमध्ये स्पार्किंग होऊ शकते. फोनला कनेक्ट असलेल्या एक्ससेरीज देखील हटवा. त्यामुळे पाणी गेल्यावर फोनमध्ये त्वरित बंद करा.

वाचा: Realme चा ३० हजारांचा फोन फक्त ८,४९९ रुपयात होईल तुमचा, जाणून घ्या ऑफर

​बॅटरी त्वरित काढा

तुमच्या फोनमध्ये पाणी गेल्यास त्यातील बॅठरी त्वरित काढा. बॅटरी काढल्यानंतर बॅटरीच्या खाली एक लहानसे स्टिकर तुम्हाला दिसेल. या स्टिकरचा रंग पांढरा असतो. परंतु, फोनमध्ये पाणी गेल्यास (what to do if mobile falls in water) याचा रंग बदलून गुलाबी अथवा लाल होतो. फोनमध्ये थोडाही ओलावा असल्यास या स्टिकरचा रंग त्वरित बदलतो. सध्या बाजारात येणारे बहुतांश फोन हे इनबिल्ड बॅटरीसह येतात. त्यामुळे बॅटरी काढणे शक्य होत नाही. अशावेळी फोनला त्वरित स्विच ऑफ करून सुकवण्याचा प्रयत्न करा.

​फोन सुकवताना या चुका टाळा

अनेकजण फोनला सुकवण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर करतात. मात्र, ही पद्धत चुकीची आहे. यामुळे फोनच्या चिपचे नुकसान होऊ शकते. फोनला सुकवण्यासाठी तुम्ही थेट सूर्यप्रकाशाची अथवा पंख्याच्या हवेची मदत घेऊ शकता. यामुळे फोनच्या मदरबोर्डवरील चिपमध्ये ओलावा राहत नाही. फोनला सुकवण्यासाठी तांदूळ देखील उपयोगी येतील. तुम्ही फोनला काही तास तांदळात ठेवू शकता. ज्यामुळे फोन त्वरित सुकेल. मात्र, हेडफोन जॅक व चार्जिंग केसमध्ये तांदळाचे दाणे अडकणार नाहीत, याची काळजी घ्या.

वाचा: अवघ्या १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा Oppo चे ‘हे’ एकापेक्षा एक भन्नाट स्मार्टफोन्स, फीचर्स एकदा पाहाच

​पूर्ण सुकल्यानंतरच घ्या काळजी

फोन पूर्ण सुकल्यानंतर पुन्हा चालू करा. त्वरित स्विच ऑन करण्याची चूक करू नका. फोन पूर्ण सुकल्यानंतरही थोडा ओलावा राहू शकतो. अशावेळी तुम्ही हार्डवेयर अथवा केमिस्टच्या दुकानातून पाणी (mobile falls in water) शोषून घेणारे कापड खरेदी करू शकता. या कापडात फोन दोन-तीन दिवस गुंडाळून ठेवा. यामुळे फोन अगदी व्यवस्थित काम करेल. फोन स्विच ऑफ करण्याआधी सिम कार्ड टाका. मात्र, मदरबोर्ड खराब झाल्यास फोन सुरू होत नाही. अशावेली डिव्हासला व्यवस्थित चेक करा.

​पावसाळ्यात फोनची अशी घ्या काळजी

पावसाळ्यात स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. खासकरून स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यास डिव्हाइस त्वरित खराब होऊ शकतो. पावसाच्या पाण्यापासून फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही Waterproof Pouch चा वापर करू शकता. याशिवाय, बाहेर पडताना नेहमी सोबत रेनकोट ठेवा. रेनकोटमुळे फोनसोबतच तुमच्या इतर वस्तूही सुरक्षित राहतील. तसेच, तुम्ही पावसात फोनवर बोलण्यासाठी डिव्हाइसला बॅगेत ठेवून Bluetooth Earphones आणि Earbuds चा वापर करू शकता.

वाचा: Smartphone Tips: फोन सर्विस सेंटरला देताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here