Akash Ubhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 5, 2022, 5:14 PM
Ration Card: महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक असलेल्या रेशन कार्डचा अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयोगी होतो. तुम्ही अगदी सहज रेशन कार्डमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाचा समावेश करू शकता.

हायलाइट्स:
- रेशन कार्डमध्ये करू शकता इतर व्यक्तींच्या नावाचा समावेश.
- सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी होतो रेशन कार्डचा उपयोग.
- रेशन कार्डग्नापे मिळेल मोफत अन्नधान्य.
वाचा: WhatsApp वर तुम्हाला कोणी केले आहे ब्लॉक? ‘या’ सोप्या ट्रिकने घ्या जाणून
रेशन कार्डमध्ये नवीन व्यक्तीच्या नावाचा असा करा समावेश
- जर एखाद्या व्यक्तीच्या नावाचा रेशन कार्डमध्ये समावेश करायचा असल्यास तुम्हाला सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx वर जावे लागेल. येथे रेशन कार्डच्या पर्यायावर क्लिक करा.
- आता ‘Ration Card Details On State Portals’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या राज्याचे नाव, जिल्हा, ब्लॉक आणि पंचायतचे नाव निवडा.
- त्यानंतर रेशनचे नाव, दुकानादाराचे नाव व रेशन कार्डचा प्रकार निवडा. आता तुमच्यासमोर एक लिस्ट असेल, ज्यात कार्डधारकांची नावे असतील. येथे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये कोणाच्या नावाचा समावेश आहे, याची माहिती मिळेल.
- जर एखाद्या व्यक्तीच्या नावाचा समावेश करायचा असल्यास तुम्हाला जवळील अन्न पुरवठा विभाग अथवा ग्राहक सेवा केंद्रावर जावे लागेल.
- पुढे तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल. सोबतच, काही महत्त्वाची कागदपत्रं द्यावी लागतील. त्यानंतर २ आठवड्यात त्या व्यक्तीच्या नावाचा रेशन कार्डमध्ये समावेश होईल.
वाचा: Smartphone Tips: तुमचा फोन पावसात भिजल्यास घाबरू नका, ‘या’ टिप्स येतील खूपच कामी
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : add new member name in ration card in maharashtra check details
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times