ओंकार गंधे

ही एक चिनी बनावटीची सोशल नेटवर्किंग सेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर केले जातात. हे व्हिडिओ लिपसिंक (डायलॉग किंवा गाण्यावर ओठांची हालचाल करणे) किंवा गाण्यावर डान्स करणे किंवा नकला करणे अशा प्रकारांमध्ये उपलब्ध असतात. २०१२ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने २०१७ मध्ये ‘म्युझिकली’ नावाची दुसरी कंपनी विकत घेऊन आपल्या कंपनीमध्ये विलीन केली. त्या नंतर या कंपनीने जगभरातील देशांमध्ये शिरकाव केला.

टिक-टॉक एवढे प्रसिद्ध का झाले?

टिक-टॉकच्या प्रसिद्धीच्या मागे त्याच्या वापरकर्त्यांचा हात आहे हे सांगण्याची गरज नाही; पण टिकटॉकवर आपल्या अभिनयाचे आणि अंगभूत कलांचे सादरीकरण करू शकतो, या विचाराने अनेक जण टिक-टॉकचा वापर करू लागले. टिक-टॉक वापरण्यास सोपे असून, त्यातील व्हिडिओमध्ये विविध इफेक्ट टाकून अजून खुलून दिसत असल्यामुळे तसेच हवे ते संगीत आणि डायलॉग टाकता येऊ शकत असल्यामुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झाले.

टिक-टॉकमुळे धोका काय?
टिक-टॉकमुळे नक्की धोका काय असा प्रश्न अनेक टिक-टॉक प्रेमींकडून सर्रास विचारला जातो. टिक-टॉकचे तांत्रिक धोके पुढील प्रमाणे आहेत.

१. एसएमएस स्पूफ : टिक-टॉकच्या वेबसाइटवरून अॅपची लिंक शेअर करू शकतो, अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे यूझरला त्वरित अॅप डाउनलोड करता येईल. हा येणारा मेसेज विविध कुणीही अगदी स्पूफ करता येतो. थोडक्यात सांगायचे, तर यामुळे यूझरला कोणीही टिक-टॉकच्या नावाने धोकादायक लिंक पाठवू शकतो. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे बँक अकाउंटही क्षणात रिकामे करता येऊ शकते वा त्याची सिस्टीम हॅक करता येऊ शकेल.

२. अत्यंत दर्जाहीन वेबसाइट कोडिंग : टिक-टॉकमध्ये एक्सएसएससारखे (XSS) विविध हल्ले अगदी सहजपणे केले जाऊ शकतील, अशी दर्जाहीन कोडिंग आहे. कोडिंगमध्ये चुका नक्कीच होऊ शकतात; पण या चुकांमुळे यूझरचं अकाउंट धोक्यात येतं. टिक-टॉकवर थोडंफार हॅकिंग जमत असलेला कोणीही अगदी सहजपणे कोणाच्याही अकाउंटवर हल्ला करून त्यावर ताबा मिळवू शकतो.

३. प्रोफाइलचा ताबा : टिक-टॉक प्रोफाइलचा ताबा मिळवून त्यावरील व्हिडिओ डिलिट करता येतात किंवा नवीन व्हिडिओ यूझरच्या नावाने टाकता येतात, ज्याची खऱ्या यूझरलाही कल्पना नसते.

४. प्रायव्हेट व्हिडिओ : टिक-टॉकवर प्रायव्हेट म्हणजे खासगी व्हिडिओ असा असा पर्याय असला, तरी तो फारसा कामाचा नाही, कारण टिक-टॉकवरील कोणताही व्हिडिओ कधीही सार्वजनिक केला जाऊ शकतो. अनेक यूझर्सनी आपले अश्लील किंवा नग्न व्हिडिओ टिक-टॉकवर टाकून ठेवले आहेत आणि त्यांना प्रायव्हेट केले आहे. असे व्हिडिओ कधीही सार्वजनिक होऊ शकतात तसेच, विविध कंपन्यांना विकले जातात.

६. खासगी माहितीचा गैरवापर : सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यूजरच्या खासगी माहितीची सुरक्षा… टिक-टॉकवर यूजरच्या खासगी माहितीची सुरक्षा अजिबात घेतली जात नाही. ज्या वेळेपासून तुमच्या मोबाइलमध्ये यूझरच्या खासगी माहितीची सुरक्षा इन्स्टॉल केली जाते, तेव्हापासून यूझरचा सर्व खाजगी डेटा टिक-टॉक घेऊ लागतो. यूझर लोकेशन, फाइल, कॉन्टॅक्ट हे सर्व अॅप आदी वापरणे आदी किरकोळ वाटत असलं, तरी हे धोकादायक आहे. खासगी फोटो, व्हिडिओ, कॅमेरा, ऑडिओ, सर्व फाइल्स, कॉल्स, कॉन्टॅक्ट्स इत्यादी अनेक गोष्टी टिक-टॉक कडून कॉपी केल्या जातात. त्या विविध कंपन्यांना विकल्या जातात. संपूर्ण देशातील लोकांच्या खासगी माहितीचा गैरवापर कोणत्याही कारणासाठी केला जाऊ शकतो. भविष्यातील हा मोठा धोका आहे.

टिक-टॉकवर बंदी का गरजेची आहे?

एकतर टिक-टॉक ही पूर्णपणे चिनी बनावटीची कंपनी आहे. त्यातही प्रचंड अनैतिक मार्गाने ही सेवा चालवली जाते. पुढील काही निवडक करणे आहेत, ज्यामुळे टिक-टॉकवर पूर्णपणे बंदी का घालणे गरजेचे आहे, हे समजून येईल.

१. यूझरच्या खासगी माहितीची सुरक्षा धोक्यात.

२. टिक-टॉकच्या स्वतःच्या वेबसाइटची सुरक्षा धोक्यात.

३. अत्यंत दर्जाहीन कोडिंग, एका मोठ्या सोशल नेटवर्किंग सर्व्हिसकडून अशा प्रकारची सेवा अपेक्षित नाही.

४. टिक-टॉकचे काही वापरकर्ते अत्यंत अश्लील आणि घृणास्पद व्हिडिओ तयार करून या मार्फत व्हायरल करतात.

५. अनेक अफवा आणि चुकीच्या गोष्टीही या मार्फत व्हायरल केल्या जातात.

टिक-टॉक आणि राष्ट्रीय सुरक्षा

टिक-टॉकमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत आहे, तसेच ही गोष्ट लक्षात घेऊन अनेक देशांनी त्यावर कारवाईही सुरू केली आहे. अमेरिकेने आपल्या सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टिक-टॉक वापर करण्यापासून पूर्णपणे मज्जाव केला आहे. अमेरिकेप्रमाणेच अनेक देशांनी टिक-टॉकवर बंदी घातलेली आहे. देशाच्या सामान्य नागरिकांसाठी सध्या बंदी जरी नसली, तरी भविष्यात ती नक्की घातली जाईल. भारतातही टिकटॉकवर बंदी घालणे गरजेचे आहे. तसा विचारही सुरू झाल्याचे वृत्त आहे.

(लेखक सायबर सुरक्षा विश्लेषक आहेत.)

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here