Samsung Guru 1215

Samsung Guru 1215 फीचर फोन ई-कॉमर्स साइट Amazon वर स्वस्तात उपलब्ध आहे. या फोनसाठी तुम्हाला १,६९९ रुपये खर्च करावे लागतील. सॅमसंगच्या या फोनमध्ये १.५० इंच TFT स्क्रीन दिली आहे. यात पॉवरसाठी 800 एमएएचची रिमूव्हेबल बॅटरी दिली आहे. फोन सॅमसंगच्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये ४ एमबी रॅम मिळेल. Samsung Guru 1215 फीचर फोन ७२० तासांचा स्टँडबाय टाइम ऑफर करतो. या फीचर फोनद्वारे तुम्ही नियमित कामे सहज करू शकता.
वाचा: Best smart home devices: हे ५ प्रोडक्ट्स तुमच्या घराला बनवतील ‘स्मार्ट होम’, पाहा संपूर्ण लिस्ट
Motorola a10 Keyboard

Motorola a10 Keyboard फीचर फोन फक्त १,३४९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. मोटोरोलाच्या या फोनला तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून खरेदी करू शकता. फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. तुम्ही फोनच्या स्टोरेजला ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात १७५० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी अनेक तास टिकते. फोनच्या करेदीवर कंपनी २ वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी देखील देत आहे. यामध्ये वायरलेस एफएमची सुविधा देखील मिळेल.
Nokia 105 Single Sim

तुम्ही जर कमी किंमतीत येणारा ब्रँडेड फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Nokia 105 हा चांगला फोन आहे. सिंगल सिम सपोर्टसह येणाऱ्या नोकियाच्या या फीचर फोनला तुम्ही Amazon वरून फक्त १,२९९ रुपयात खरेदी करू शकता. यात दमदार बॅटरी बॅकअप दिला आहे. तसेच, २ हजार कॉन्टॅक्ट्स आणि ५०० एसएमएस स्टोर करता येईल. तुम्ही क्लासिक स्नेक गेम देखील खेळू सकता. फोन बिल्ट-इन रेडिओ आणि फ्लॅश लाइटसह येतो.
Motorola a50 Keypad

या लिस्टमधील हा मोटारोलाचा दुसरा फीचर फोन उपलब्ध आहे. Motorola a50 Keypad फीचर फोनला तुम्ही फक्त १,५४९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये मीडियाटेक प्रोसेसर दिला आहे. यात १७५० एमएएचची दमदार बॅटरी देखील मिळते. डिव्हाइसच्या स्टोरेजला ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनच्या खरेदीवर २ वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी दिले जाते. यामध्ये म्यूझिक प्लेयर देखील दिला आहे. फोन ई-कॉमर्स साइट Amazon वर स्वस्तात उपलब्ध आहे.
Lava Gem

Lava Gem फीचर फोनसाठी तुम्हाला १,६८० रुपये खर्च करावे लागतील. फोनमध्ये १.३ मेगापिक्सलचा कॅमेरा देखील मिळतो. यात २.८ इंच QVGA डिस्प्ले दिला आहे. फोनच्या स्टोरेजला ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात १७५० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी अनेक तास टिकते. फोनच्या खरेदीवर १ वर्षाची मॅन्यूफॅक्चरर रिप्लेसमेंट वॉरंटी आणि ६ महिन्यांची इन-बॉक्स एक्सेसरीज वॉरंटी मिळेल. लावाचा हा फीचर फोनवर Amazon वर उपलब्ध आहे.
वाचा: अरेच्चा! लाँचआधीच iPhone 14 ची प्री-बुकिंग सुरू, किंमत वाचून बसेल धक्का; पाहा काय आहे खास
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times