नवी दिल्लीः कंपनीने मार्च महिन्यात स्वस्त किंमतीतील लाँच केला. या आयफोनची किंमत कमी ठेवल्याने हा आयफोन चर्चेत आला आहे. अॅपलने आपला लेटेस्ट ए१३ बायोनिक चिप यात दिला आहे. जर तुम्ही अँड्रॉयड ते iOS वर स्विच करीत असाल तर सर्वात लेटेस्ट आणि कमी किंमतीतील iPhone SE 2020 आणला आहे. परंतु, हार्डवेअरमध्ये नवीन आयफोन सारखा आहे. तसेच आता नवीन डिटेल्ससह याचा टियर डाऊन व्हिडिओ समोर आला आहे.

वाचाः

२०१७ साली सप्टेंबर मध्ये लाँच करण्यात आलेल्या iPhone 8 सारखी बॉडी नवीन आयफोन मध्ये दिली आहे. यात फेस आयडीच्या जागी टच आयडी होम बटन देण्यात आले आहे. पीबीके रिव्ह्यूकडून एक टियरडाऊन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवीन आयफोनमध्ये देण्यात आलेले सर्व पार्ट्स हे iPhone 8 यासारखीच आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्या आयफोनमध्ये आयफोन ८ चा कॅमेरा दिला आहे. डिस्प्ले पासून बॅटरी पर्यंत सर्व आयफोन ८ चे फीचर्स दिले आहेत. अॅपलने नो कॉस्ट कटिंग केली आहे. व्हिडिओत आयफोन ८ आणि नवीन आयफोन एसईला बाजुला ठेऊन इंटरनल हार्डवेअर दाखवण्यात आले आहे. गंमत म्हणजे या दोन्ही आयफोनचे पार्ट एकदुसऱ्याला बदली करता येऊ शकतात. परंतु, नवीन आयफोनमध्ये बॅटरी कनेक्टर दुसऱ्या बाजुला आहे.

वाचाः

अॅपलने iPhone 11 सीरीज मधील जबरदस्त प्रोसेसर आपल्या नवीन iPhone SE मध्ये दिला आहे. परंतु, हार्डवेअरमध्ये हा मोबाइल तीन वर्ष जुना आहे. त्यामुळे कॅमेरा सेन्सर अपग्रेड न करणे अनेक युजर्संना निराश करणारा आहे. भारतात या आयफोनची किंमत ४२ हजार ५०० रुपये आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here