Flipkart Electronics Sale: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart) इलेक्ट्रॉनिक्स सेलला (Flipkart Electronics Sale) सुरुवात झाली आहे. ६ जुलैपासून सुरू झालेल्या या फ्लिपकार्ट सेलचा फायदा तुम्ही १० जुलैपर्यंत घेऊ शकता. सेलमध्ये तुम्हाला स्मार्टवॉच, इयरफोन्स, टॅबलेट, लॅपटॉप आणि मोबाइल एक्सेसरीज सारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. तुम्हाला सेलमध्ये डिव्हाइसवर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. तुम्ही दैनंदिन वापरासाठी उपयोगी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट सेलमध्ये काही आकर्षक डील्स फायदा मिळेल. Flipkart Electronics Sale मध्ये तुम्ही Callmate 65W अल्ट्रा-कॉम्पॅक्ट चार्जर, boAt Rockerz हेडफोन, Fire-Boltt ची स्मार्टवॉच व पॉवर बँकसारखे प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. विशेष म्हणजे या प्रोडक्ट्सची सुरुवाती किंमत १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कमी किंमतीत येणाऱ्या या डिव्हाइसविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Callmate 65W अल्ट्रा-कॉम्पॅक्ट चार्जर

callmate-65w-

तुमच्या स्मार्टफोनचा चार्जर खराब झाला असेल तुम्ही नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Callmate 65W अल्ट्रा-कॉम्पॅक्ट चार्जर एक चांगला पर्याय आहे. Flipkart Electronics Sale मध्ये तुम्हाला Callmate च्या या ६५ वॉटच्या चार्जरवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. कॉलमेटच्या या चार्जरची मूळ किंमत १,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही Callmate च्या या शानदार चार्जरला सेलमध्ये ६० टक्के डिस्काउंटनंतर फक्त ७९९ रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: लिस्ट तयार ठेवा! सुरू होतोय Amazon चा खास सेल, ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

​boAt Rockerz हेडफोन

boat-rockerz-

boAt ला स्वस्त ऑडिओ प्रोडक्ट्ससाठी ओळखले जाते. कंपनी भारतीय बाजारात सातत्याने नवीन इयरफोन्स, इयरबड्सला लाँच करत आहे. फ्लिपकार्टवर boAt Rockerz 235v2/238 हेडफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या हेडफोनची मूळ किंमत २,९९० रुपये आहे. परंतु, तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये ६९ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ८९९ रुपयात खरेदी करू शकता. म्हणजेच तुमची २.०९१ रुपयांची बचत होईल. हा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणारा नेकबँड इयरफोन आहे. तुम्हाला गाणी ऐकण्याची आवड असल्यास हा इयरफोन फायद्याचा ठरेल.

​Fire-Boltt निंजा प्रो मॅक्स स्मार्टवॉच

fire-boltt-

Fire-Boltt Ninja Pro Max Smartwatch फ्लिपकार्टवर खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. या वॉचमध्ये १.६ इंच कलर एलसीडी डिस्प्ले दिला आहे. यात अनेक वेगवेगळे हेल्थ फीचर्स दिले आहेत. तसेच, २७ स्पोर्ट्स मोड देखील मिळतात. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये Fire-Boltt च्या या स्मार्टवॉचला तुम्ही ७० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या वॉचची मूळ किंमत ५,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १,७९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

वाचा: Recharge Plans: १ वर्षाची व्हॅलिडिटी, ७३० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह हॉटस्टार फ्री; पाहा ‘हा’ प्रीपेड प्लान

​HOBINS 10000mAh पॉवर बँक

hobins-10000mah-

तुम्ही जर नियमितपणे प्रवास करत असाल तर अशावेळी पॉवर बँकची गरज पडते. तुम्ही जर पॉवर बँक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर HOBINS चा १००००mAh चा पॉवर बँक चांगला पर्याय ठरेल. या पॉवर बँकद्वारे तुम्ही फोनला दोन-तीन वेळा सहज फुल चार्ज करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये या पॉवर बँकवर ७० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. HOBINS च्या या पॉवर बँकची मूळ किंमत १,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर फक्त ५९९ रुपयात खरेदी करता येईल.

​QUANTUM QHM224D ऑप्टिकल माउस

quantum-qhm224d-

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये QUANTUM QHM224D ऑप्टिकल माउस खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. सेलमध्ये क्वांटम ऑप्टिकल माउसवर तुम्हाला ८० टक्के बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. या ऑप्टिकल माउसची मूळ किंमत ४९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये फक्त ९९ रुपयात उपलब्ध आहे. दरम्यान, फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमधून तुम्ही इतर प्रोडक्ट्सला देखील स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीसह अनेक वस्तू आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहेत.

वाचा: Flipkart Sale: ५०००mAh बॅटरी, ५०MP कॅमेऱ्यासह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टफोन्स, किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here