Akash Ubhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 8, 2022, 12:07 PM
Redmi K50i Launch Soon: रेडमी २० जुलैला आपल्या नवीन स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करणार आहे. लाँचआधीच Redmi K50i स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सचा खुलासा झाला आहे.

हायलाइट्स:
- लवकरच लाँच होणार रेडमीचा नवीन स्मार्टफोन.
- लाँचआधी Redmi K50i ची किंमत आली समोर.
- दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येईल फोन.
वाचा: १० हजार रुपये स्वस्त मिळतोय Samsung चा ३२ इंच Smart TV, जाणून घ्या किंमत-फीचर्स
Redmi K50i ची भारतातील किंमत आणि ऑफर्स
- Redmi K50i स्मार्टफोन ६ जीबी / ८ जीबी आणि १२८ जीबी / २५६ जीबी स्टोरेजसह येईल.
- रिपोर्टनुसार, ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २४ ते २८ हजार रुपये असेल. फोनची किंमत २६,९९९ रुपये असू शकते.
- तर ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये असण्याची शक्यता आहे.
- रेडमीचा हा फोन फँटम ब्लू, स्टील्थ ब्लॅक आणि क्विक सिल्वर रंगात येईल. हा स्मार्टफोन २२ जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
- Xiaomi ने ग्राहकांना इंस्टंट डिस्काउंट ऑफर करण्यासाठी HDFC सोबत पार्टनरशिप केली आहे. फोन Amazon India, Mi Stores आणि रिटेल पार्टनर्सच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध होईल.
वाचा: जुना फोन द्या आणि नवीन iPhone घेऊन जा, ‘या’ मॉडेल्सवर मिळत आहे हजारो रुपये डिस्काउंट
Redmi K50i चे स्पेसिफिकेशन्स
- Redmi K50i हा रिबॅज्ड Poco X4 GT आहे. यामध्ये ६.६ इंच १४४ हर्ट्ज LCD डिस्प्ले दिला असून, याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे.
- Redmi K50i मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८१०० प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. याशिवाय, ६७ वॉट वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०८० एमएएचची बॅटरी दिली जाईल.
- डिव्हाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर मिळतो. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
- Redmi चा हा फोन अँड्राइड १२ आधारित MIUI १३ वर काम करतो. फोनची जाडी ८.८एमएम आणि वजन २०० ग्रॅम असू शकते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : redmi k50i smartphone launch soon in india check all details
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times