| महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 8, 2022, 1:41 PM

Infinix Note 12 5G Series Launched: इनफिनिक्सने भारतीय बाजारात आपल्या दोन ५जी स्मार्टफोन्स लाँच केले आहे. या फोन्सची सुरुवाती किंमत १४,९९९ रुपये आहे. फोन खरेदीवर बँक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल.

 

Infinix

हायलाइट्स:

 • Infinix Note 12 5G सीरिज लाँच.
 • फोनमध्ये मिळेल ५००० एमएएचची दमदार बॅटरी.
 • या फोन्सची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी.
नवी दिल्ली :Infinix भारतीय बाजारात आपल्या Note 12 5G सीरिजला अखेर लाँच केले आहे. या दोन सीरिज अंतर्गत कंपनीने Infinix Note 12 5G आणि Infinix Note 12 pro 5G या दोन स्मार्टफोन्सला सादर केले आहे. कंपनीने फोन्सला Marvel: Dr Strange in The Multiverse of Madness थिमसह लाँच केले आहे. फोनची किंमत २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये आहे. प्रमुख स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर ५जी कनेक्टिव्हिटी, शानदार डिस्प्ले, ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा, ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. Infinix Note 12 5G सीरिजच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घ्या.

वाचा: Google Maps च्या मदतीने तुमचा प्रवास होईल सोपा, ‘हे’ ५ फीचर्स देतील ट्रॅफिकपासून ते टोल नाक्यापर्यंतची सर्व माहिती

Infinix Note 12 5G सीरिजची किंमत आणि ऑफर्स

 • Infinix Note 12 5G स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर Infinix Note 12 pro 5G च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे.
 • Axis बँकेच्या कार्डचा वापर केल्यास १,५०० रुपये इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल.
 • दोन्ही स्मार्टफोन स्नोफॉल व्हाइट आणि फोर्स ब्लॅक रंगात उपलब्ध आहेत. फोन्सला फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करू शकता.

वाचा: Recharge Plans: १ वर्षाची व्हॅलिडिटी, ७३० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह हॉटस्टार फ्री; पाहा ‘हा’ प्रीपेड प्लान

Infinix Note 12 5G सीरिजचे स्पेसिफिकेशन्स

 • Infinix Note 12 5G सीरिजेच दोन्ही स्मार्टफोन्स ६.७ इंच FHD+ AMOLED डिस्प्लेसह येतात. याचा टच सँपलिंग रेट १८० हर्ट्ज आस्पेक्ट रेशियो २०:९, पीक ब्राइटनेस ७०० निट्स आण स्क्रीन टू बॉडी रेशियो ९१.४ टक्के आहे.
 • फोन गोरिल्ला ग्लास ४ प्रोटेक्शन, १०८०x२४०० पिक्सल आणि DTS सराउंड सिस्टमसह ड्यूल स्पीकरसोबत येतो.
 • फोनमध्ये ६nm MediaTek डायमेंसिटी ८१० ५G ऑक्टा-कोर ६४ बिट प्रोसेसर दिला असून, ज्याची CPU फ्रीक्वेंसी २.४GHz पर्यंत आहे.
 • Note 12 5G मध्ये ६ जीबी LPDDR४x RAM (७GB पर्यंत एक्सपेंडेबल) आणि ६४GB UFS२.२ स्टोरेज दिले आहे. तर Note 12 Pro 5G मध्ये ८GB LPDDR४x रॅम (१३GB पर्यंत एक्सपेंडेबल) आणि १२८GB UFS२.२ स्टोरेज दिले आहे.
 • Note 12 5G सीरिज ड्यूल सिम ५G कनेक्टिव्हिटीसह येता.
 • Note 12 5G मध्ये क्वाड एलईडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा आणि Note 12 Pro 5G मध्ये क्वाड एलईडी फ्लॅशसह अल्ट्रा क्लिअर १०८ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फीसाठी ड्यूल एलईडी फ्लॅश लाइटसह १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
 • यामध्ये पॉवरसाठी ३३ वॉट टाइप सी फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन अवघ्या दीड तासात फुल चार्ज होतो.

वाचा: १० हजार रुपये स्वस्त मिळतोय Samsung चा ३२ इंच Smart TV, जाणून घ्या किंमत-फीचर्स

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : infinix note 12 5g series launched in india know the price features and specifications
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here