Best Camera Smartphones: आजकाल मोबाईल फोन विकत घेताना ग्राहक ज्या फीचरकडे सर्वाधिक लक्ष देतात ते म्हणजे कॅमेरा क्वालिटी. चांगले कॅमेरा सेन्सर असलेले अनेक ब्रँडेड स्मार्टफोन आता बाजारात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, महागड्या DSLR कॅमेऱ्यांची कमतरताही या फोन्सनी भरून काढली आहे. बाजारात, तुम्हाला Samsung, Oneplus, Vivo, Xiaomi, Oppo सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन मिळतील. जे OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) आणि EIS (इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन) ड्युअल-टोन LED फ्लॅश, 4K HDR10+ आणि 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफर करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट स्मार्ट फोनबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. जे तुम्ही सध्या २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता आणि उत्तम कॅमेरा क्वालिटी मिळवू शकता. लिस्टमध्ये Xiaomi Redmi Note 11 Pro, OnePlus Nord CE 2 Lite 5G चाही समावेश आहे.

Samsung Galaxy M33 5G

samsung-galaxy-m33-5g

Samsung Galaxy M33 5G १७,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. या सॅमसंग फोनमध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये Samsung Exynos 1280 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ६००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी, ५ मेगापिक्सेल, २ मेगापिक्सेल, २ मेगापिक्सेल क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ -मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये ६.६ -इंचाचा TFT डिस्प्ले आहे आणि तो Android 12 OS सह येतो.

वाचा: Smartphone Offers : ६ GB RAM सह येणाऱ्या बजेट फ्रेंडली Realme C35 वर मिळतोय ऑफ, फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप

OPPO K10 5G

oppo-k10-5g

Oppo K 10 5G स्मार्टफोन १८,९९० रुपयांना घेता येईल. फोनमध्ये MediaTek डायमेंशन 810MT6833 प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅमचा पर्याय आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह २ मेगापिक्सेलचा डुअल रियर कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. Oppo K 10 5G स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. फोन Android 12 OS सह येतो.

वाचा : थिएटरसारखे एंटरटेनमेंट घरीच ! १२० इंच-4K स्क्रिनसह Hisense Laser TV लाँच, किंमत पाहून बसेल धक्का

One Plus Nord CE 2 Lite 5G

one-plus-nord-ce-2-lite-5g

OnePlus Nord CE 2 Lite 5G ची भारतात किंमत २८,९९९ रुपये आहे. फोनमध्ये MediaTek डायमेंशन 1300 MT 6893 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ GB पर्यंत रॅम उपलब्ध आहे. स्टोरेज १२८ GB आहे. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये ६.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Android 12 OS सह येतो.

वाचा : Jio Plans: सर्वात स्वस्त प्लान, रिचार्ज करा आणि ३३६ दिवसांसाठी टेन्शन Free राहा, मिळतात डेटा-कॉलिंग बेनिफिट्स

Xiaomi Redmi Note 11 Pro

xiaomi-redmi-note-11-pro

Xiaomi Redmi Note 11 Pro मध्ये ६ GB रॅम आहे. फोनमध्ये १२८ GB इनबिल्ट स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सेल प्रायमरी रियर कॅमेरासह ८ मेगापिक्सेल, २ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सेल सेन्सर्ससह क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Redmi Note 11 Pro ला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली असून Xiaomi च्या या फोनमध्ये ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनची सुरुवातीची किंमत १८,९९९ रुपये आहे.

वाचा : Best Budget Bulbs: घरी आणा ‘हे’ ऑटो ऑन ऑफ बल्ब, वीज बिल येईल कमी, किंमत २९९ रुपये

Vivo T1

vivo-t1

Vivo T1 स्मार्टफोन १४,९९० रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. या Vivo स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ५० -मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, २ मेगापिक्सलचे दोन सेन्सरही आहेत. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय आहे. Vivo T1 हँडसेटला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, फोनमध्ये ६.८ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Android 12 OS सह येतो.

वाचा : Portable Fans: विजेशिवाय १५ तासांपर्यंत चालतात ‘हे’ पोर्टेबल फॅन्स, कॅरी करायला सोप्पे, किंमतही खूप कमी, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here