स्मार्टफोनवर मिळेल ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट डिस्काउंट

- Amazon Prime Days sale मध्ये तुम्ही स्मार्टफोनला ४० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तसेच, याशिवाय, फोनला नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्ससह देखील खरेदी करता येईल.
- Amazon Prime Days सेलमध्ये OnePlus 10 Pro आणि Galaxy S20 FE सारख्या प्रीमियम स्मार्टफोन्सला निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. Amazon ने अद्याप या फोन्सवरील ऑफर्सचा खुलासा केलेला नाही. परंतु, यावर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. पुढील काही दिवसात याबाबतची माहिती समोर येईल.
इतरही फोन्सवर मिळेल आकर्षक ऑफर्स

- सध्या OnePlus 10 Pro 5G ची किंमत ६६,९९९ रुपये आणि सॅमसंगच्या Galaxy S20 FE ची किंमत ३६,९९० रुपये आहे. ग्राहक Amazon सेलमध्ये OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि iQoo Z6 5G सारख्या काही बजेट व मिड-बजेट स्मार्टफोनला देखील स्वस्तात खरेदी करू शकतात.
- काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या iQoo Neo 6 5G वर देखील सेलमध्ये ऑफर्सचा फायदा मिळेल. फोनच्या ८ जीबी रॅम मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये आहे.
Amazon प्रोडक्ट्सवर ५५ टक्के डिस्काउंट

- सेलमध्ये Amazon च्या इन-हाउस प्रोडक्ट्सवर ५५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. नवीन इको डॉटला (4 जेनरेशन, ब्लॅक) तुम्ही ३ हजार रुपयांशी कमी किंमतीत खरेदी करू शकता.
- अॅलेक्सा वॉइस रिमोटसह फायर टीव्ही स्टिक (३rd जनरेशन २०२१) देखील ३,९९९ रुपयांऐवजी ३ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल.
- तुम्हाला किंडल ई-रीडर खरेदी करायचे असल्यास, ६ इंच डिस्प्ले आणि बिल्ट-इन लाइटसह येणारे किंडल सेलमध्ये ७ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल. याची किंमत सध्या ७,९९९ रुपये आहे.
TWS इयरबड्सवर ७० टक्के डिस्काउंट

- Amazon Prime Days सेलमध्ये ब्लूटूथ हेडफोनवर ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. सेलमध्ये Samsung Galaxy Buds Pro ला खरेदी करण्यासाठी ८,४९० रुपये खर्च करावे लागतील.
- याशिवाय, Sony WF-1000XM4 वर देखील बंपर डिस्काउंट मिळेल. याची सध्या किंमत १९,९९० रुपये आहे.
- सेलमध्ये Realme Buds Wireless 2, Vivo TWS 2E आणि Boult Powerbuds TWS देखील बंपर डिस्काउंटसह उपलब्ध होईल. Amazon Sale मध्ये तुम्हाला इतरही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times