Reasons That Cause Damage To Smartphones: स्मार्टफोन ही आज प्रत्येकाची गरज बनली आहे. पण, अनेकदा फोन वापरतांना युजर्स निष्काळजी करतात आणि फोन खराब व्हायला लागतो. इलेक्ट्रॉनिक गोष्टी केव्हाही खराब होऊ शकतात यात शंका नाही. पण यंत्र बिघडण्यामागे अनेकदा युजर्सचा निष्काळजीपणा असतो यात शंका नाही. विशेषतः मोबाईलमध्ये. कान आणि खांद्यामध्ये अडकलेल्या फोनवर बोलल्याने तो पडून तुटतो हे माहीत आहे, पण तरीही युजर्स तसे करतात. कारण, गाडी चालवायला किंवा इतर काही काम करण्यासाठी त्यांना हात मोकळा हवा असतो . यामुळे फोनचे नुकसान सहन करावे लागते. असे होऊ नये आणि स्मार्टफोन वर्षानुवर्षे चांगला चालावा असे तुम्हाला वाटत असेल तर, या काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या असे न केल्यास तुमचा फोन खराब होऊ शकतो.जाणून घ्या सविस्तर.

Local Charger

local-charger

फोनमध्ये कोणताही चार्जर आणि इअरफोन वापरणे: फोन चार्ज करण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी कोणाचाही चार्जर किंवा इअरफोन युजर्स अनेकदा वापरतात. परंतु, ते फोनचे नुकसान करू शकते. अशा परिस्थितीत फोनचा स्लॉट खराब होऊ शकतो आणि फोनचे बरेच नुकसान होण्याची देखील शक्यता असते.

फोनवर मेटल कव्हर वापरणे: फोनच्या सुरक्षेसाठी तुम्ही त्यात मेटल कव्हर लावले असले तरी, तुम्हाला कदाचित माहित नसेल की यामुळे फोनचे नुकसान होते. मेटल कव्हरमुळे तुमच्या फोनमध्ये नेटवर्क समस्या असू शकते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही तुमच्या फोनमध्ये एखादे कव्हर ठेवता तेव्हा ते नीट पहा आणि शक्य असल्यास, कंपनीने लाँच केलेले कव्हर वापरा.

वाचा : Pan Card हरविले-खराब झाले तर काळजी नको, एजंटशिवाय घर बसल्या ‘असे’ मिळवा ड्युप्लिकेट पॅन कार्ड, पाहा प्रोसेस

Third Party Apps

third-party-apps

अज्ञात स्त्रोतांकडून अॅप्स स्थापित करणे: अँड्रॉइड फोनमध्ये अॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी Google Play Store इंटिग्रेट केले आहे. परंतु अनेक वेळा युजर्स अॅप इन्स्टॉल करण्यासाठी साइडलोड किंवा कोणतेही थर्ड पार्टी अॅप वापरतात. साइडलोड म्हणजे एपीके फाइल ब्लूटूथवर किंवा पीसीवरून हस्तांतरित करणे आणि फोनवर स्थापित करणे. असे करण्यासाठी जाता तेव्हा चेतावणी दिली जाते की यामुळे फोन खराब होईल. परंतु, तरीही युजर्स Apps Install करतात . यामुळे फोनचे खूप नुकसान होऊ शकते आणि फोन पूर्णपणे खराब होऊ शकतो.

वाचा :Best Plans: युजर्सचा फेव्हरेट आहे ‘हा’ प्लान,अनलिमिडेट डेटा-कॉलिंगसह Amazon Prime आणि Disney+ Hotstar सुद्धा फ्री

Continuous Use

continuous-use

चोवीस तास फोन वापरणे: फोन कधीच बंद नसतो. असे अनेक जण अभिमानाने सांगतात. पण, असे करणे योग्य नाही. फोन अधून-मधून बंद केला पाहिजे आणि शक्य असल्यास आठवड्यातून दोन वेळा रीस्टार्ट करा. यामुळे, कॅशे मेमरी Clear होते आणि फोनमधील सर्व अॅप्स सुरळीतपणे काम करतात.

फोन कारच्या डॅशबोर्डवर ठेवणे: अनेक वेळा आपण गाडीत बसताना फोन डॅशबोर्डवर ठेवतो पण त्यामुळे तुमच्या फोनचे किती नुकसान होऊ शकते हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. डॅशबोर्ड बर्‍याचदा गरम असतो आणि फोन बराच काळ चालू ठेवल्यास, फोन गरम होऊ शकतो, स्फोट होऊ शकतो किंवा पूर्णपणे खराब होऊ शकतो.

वाचा :Smartphone Price Cut: फ्लॅगशिप फीचर्ससह पॅक्ड iQOO Z3 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी, किमतीत मोठी कपात

Overnight Charging

overnight-charging

फोन रात्रभर चार्जवर ठेवणे: रात्रभर चार्जिंगवर ठेवल्यास तुमचा फोन ओव्हरचार्ज होईल आणि तो खराब होईल असे म्हणणार नाही. त्यापेक्षा भारतातील विजेची स्थिती पाहिली तर येथील वीज अत्यंत अस्थिर आहे. म्हणजेच व्होल्टेजमध्ये चढ-उतार होत राहतात, अशा स्थितीत फोन विनाकारण जास्त वेळ चार्जमध्ये ठेवणे म्हणजे अडचणीला आमंत्रण देणे.

फोन वरच्या खिशात ठेवणे: फोन वरच्या खिशात ठेवला तो पडला आणि खराब झाला असे तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल. एवढेच नाही तर येथून चोरीचा धोका जास्त असतो, तरीही लोक शर्टच्या वरच्या खिशात फोन ठेवतात.

वाचा : OMG ! युजर्सचे वाढू शकते टेन्शन, Nothing Phone (1) बॉक्समध्ये चार्जर नाही ? पाहा डिटेल्स

Hard Surface

hard-surface

फोन कुठेही ठेवू नका :अनेकदा असे दिसून येते की, आपण आपल्या फोनबाबत खूप बेफिकीर असतो आणि तो कुठेही ठेवतो. पण, फोन कुठेही ठेवण्यापूर्वी, surface कसा आहे हे पाहा. कारण अनेकदा तुम्ही फोन टेबलावर किंवा कोणत्याही Hard Surface वर ठेवता आणि यामुळे कॅमेरा स्क्रॅच होण्याची शक्यता असते. थोडासा स्क्रॅच होताच फोनची पिक्चर क्वालिटी खराब होईल.

घाम येत असताना फोन वापरणे: उन्हाळ्यात तुम्हाला अनेकदा घाम येतो आणि तुम्ही फोनवर बोलत असता. अशात, हे लक्षात घ्यावे की अनेक फोनमध्ये शीर्षस्थानी इयरफोन स्लॉट असतो. त्यामुळे तुम्ही ज्या इअरपीसवर बोलता ते सुद्धा घामाने ओले होते . यामुळे अनेकदा फोन खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्ही ब्लूटूथ वापरत असाल तर ते अधिक चांगले आहे.

वाचा: Portable Fans: विजेशिवाय १५ तासांपर्यंत चालतात ‘हे’ पोर्टेबल फॅन्स, कॅरी करायला सोप्पे, किंमतही खूप कमी, पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here