Akash Ubhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 9, 2022, 1:30 PM
Update Mobile Number In Aadhaar Card: आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक करण्याची प्रोसेस खूपच सोपी आहे. यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावून फॉर्म भरून द्यावा लागेल. आधारशी मोबाइल नंबर लिंक असल्यास तुम्ही अनेक सेवांचा फायदा घेऊ शकता.

हायलाइट्स:
- आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे गरजेचे.
- सहज लिंक करू शकता आधारशी मोबाइल नंबर.
- घरबसल्या घेऊ शकता आधार सेवा केंद्राची अपॉइंमेंट.
वाचा: SBI च्या खातेधारकांना आता फोनवरच मिळणार सर्व सुविधा, ‘या’ नंबरवर करावा लागेल
आधार कार्डशी नंबर लिंक करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
- जर तुम्हाला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल नंबर बदलायचा असेल अथवा दुसरा नंबर लिंक करायचा असल्यास यासाठी सर्वात प्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल. येथे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला आधार सेवा केंद्रावरील अपॉइंमेंट घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही तारीख निवडू शकता. याशिवाय, थेट सेवा केंद्रावर देखील जाऊ शकता.
- आधार सेवा केंद्रावर गेल्यावर तुम्हाला मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी आधार करेक्शन फॉर्म भरून द्यावा लागेल.
- या फॉर्ममध्ये तुमचे नाव, आधार नंबर व जो मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक करायचा आहे, त्याची माहिती द्यावी लागेल.
- त्यानंतर हा फॉर्म आधार सेवा केंद्रावरील अधिकाऱ्याला द्या. त्यानंतर बायोमेट्रिक माहिती तपासली जाईल व तुमचा नवीन मोबाइल नंबर अवघ्या काही तासात अपडेट होईल.
वाचा: अवघ्या ८,२९९ रुपयात घरी घेऊन जा मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही, मिळेल ३ वर्षांची वॉरंटी
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : how to update mobile number in aadhaar card know step by step online process
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times