वाचाः
या सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये ए१४ बायोनिक प्रोसेसर दिला जाईल. आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्टनुसार, या सीरिज अंतर्गत चार मॉडेल आयफोन १२, आयफोन १२ प्लस, आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्स लाँच करण्यात येणार आहेत. आयफोन १२ मध्ये ५.४ इंचाची स्क्रीन, आयफोन १२ प्लस मध्ये ६.१ इंचाची स्क्रीन, आयफोन १२ प्रोमध्ये ६.१ इंचाची स्क्रीन, आणि आयफोन १२ प्रो मॅक्समध्ये ६.७ इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते. सीरिजच्या दोन स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा, एलसीडी स्क्रीन आणि स्लीम अॅल्युमिनियम अलॉय फ्रेमचा वापर केला जाऊ शकतो. अन्य दोन मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा, ओलेड स्क्रीन आणि स्टेनलेस स्टील मिडल फ्रेमचा वापर केला जावू शकतो.
वाचाः
आयफोन १२, आयफोन १२ प्लस, आयफोन १२ प्रो आणि या तीन फोनला सप्टेंबर महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. आयफोन १२ प्रो मॅक्सला ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times