
वारंवार फोन चार्ज करणे मोठी समस्या आहे. मात्र, Samsung Galaxy F series मधील इतर स्मार्टफोन्सप्रमाणेच Galaxy F13 देखील दमदार बॅटरी लाइफसह येतो. परंपरा कायम ठेवत फोनमध्ये नॉन स्टॉप एंटरटेनमेंटसाठी पॉवरफुल 6000mAh battery दिली आहे. ही बॅटरी आवडते शोज आणि चित्रपट बिंज-वॉचिंग करताना अनेक तास टिकते. तसेच, चार्जिंगसाठी यात इन-बॉक्स 15W Fast charger दिला असून, जो फोनला अगदी काही मिनिटात चार्च करतो.
भन्नाट एंटरटेनमेंटसाठी मिळतो FHD+ display

Galaxy F13 चा मुख्य उद्देश हा यूजर्सला शानदार व्ह्यूइंग एक्सपीरियन्स देणे आहे. यासाठी यामध्ये 16.72cms/ 6.6-inch FHD+ display दिला असून, यामुळे तुम्हाला फोनचा शानदार व्ह्यूइंग एक्सपीरियन्स मिळतो. मोठ्या डिस्प्लेमुळे आवडते चित्रपट-सीरिज मिळतात चांगला अनुभव मिळतो. या स्क्रीनवर केवळ आवडते-चित्रपट पाहण्याचा आनंदच नाही तर तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत ऑनलाइन गेमिंगचा देखील शानदार अनुभव मिळेल.
कोणत्याही अडथळ्याशिवाय एंटरटेनमेंटसाठी Auto Data Switching फीचर

अनेकांना प्रवास करायला खूप आवडते. मात्र, आपण ज्या ठिकाणी जातो, तेथे नेटवर्क कनेक्टिव्हिटी असेलच असे नाही. यामुळे तुमच्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांशी तेथील अनुभव त्वरित शेअर करता येत नाही. मात्र, Galaxy F13 मुळे तुम्ही या सर्वांशी सहज कनेक्टेड राहू शकता. फोनमधील Auto Data Switching मोडमुळे प्रायमरी सिममध्ये नेटवर्क नसल्यास आपोआप सेकेंडरी सिममध्ये स्विच होतो. यामुळे तुम्ही नियमितपणे कनेक्टेड राहता व कोणत्याही अडथळ्याशिवाय आवडत्या शोज-चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.
जबरदस्त मल्टीटास्किंग अनुभवासाठी – 8GB RAM सह -RAM प्लस

तरुण स्मार्टफोन युजर्सच्या मुख्य दोन पेन पॉइंट्सपैकी एक म्हणजे मल्टीटास्किंग. स्मार्टफोनवरील अॅप्सच्या अॅरेसह, रॅम अपुरी असल्यास त्यांच्यामध्ये जुगलबंदी करणे हा त्रासदायक अनुभव असू शकतो. ही गोष्ट कोणालाही अनुभवायची नसते. त्यामुळे या युजर पेन पॉईंटची दखल घेत सॅमसंगने गॅलेक्सी F13 रॅम प्लस फीचरसह लोड केले. या फीचरसह, तुमचे डिव्हाइस फोनच्या इंटर्नल स्टोरेजवरील रिकामी जागा घेऊ शकते आणि व्हर्च्युअल रॅम म्हणून वापरू शकते; यात, रॅम अक्षरशः 8GB पर्यंत दुप्पट करता येते आणि इतक्या अतिरिक्त रॅमसह, तुम्ही सहजपणे मल्टीटास्क करू शकता, अॅप्समध्ये स्विच करू शकता. तुमच्या मनोरंजनाच्या दैनंदिन डोसमधून कधीही विश्रांती घेण्याची गरज नाही.
जर तुम्हाला शो / चित्रपट पाहण्यासाठी योग्य असा स्मार्टफोन हवा आहे ? ज्याची बॅटरी खूप जास्त आहे. जो काळजी न करता तासनतास चालू शकतो. त्याच वेळी अॅप्समध्ये सहजतेने जुगलबंदी करू शकते आणि तुम्हाला बाहेरील जगाशी जोडलेले ठेवू शकतो. तर, तुम्ही Galaxy F13 चा विचारू शकता. ही एक सर्वोत्तम डील आहे. हे डिव्हाइस केवळ फीचर्सने परिपूर्ण नाही. तर, त्यात किंमत टॅग देखील आहे. जे या उन्हाळ्यात एक मस्ट हॅव आहे. पण थांबा ! या स्मार्टफोनमध्ये आणखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. जी त्याला एक खरा एंटरटेनर म्हणून समोर आणतात.
यापैकी काही उल्लेखनीय फीचर्स

Galaxy F13 ला पॉवर करणारा Exynos 850 प्रोसेसर शक्तिशाली आहे. जो सर्व सुरळीत चालू ठेवतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनोरंजन सत्रांमध्ये अनावश्यक अडचणी येत नाही. Galaxy F13 मध्ये मोठा 50MP ट्रिपल कॅमेरा आहे. जो तुमचा सोशल मीडिया गाजवण्यासाठी शार्प आणि व्हायब्रन्ट फोटोज काढू शकतो. डिव्हाइस सुरक्षित करण्यासाठी, सॅमसंगने त्याचे बहुचर्चित नॉक्स सुरक्षा फीचर जोडले आहे. हा प्रगत हार्डवेअर-सॉफ्टवेअर स्तरावरील सुरक्षा स्तर तुमचा डेटा कोणत्याही प्रकारच्या धोक्यांपासून आणि मालवेअरपासून सुरक्षित ठेवतो. Galaxy F13 वॉटरफॉल ब्लू, सनराईज कॉपर आणि नाईटस्की ग्रीन (Waterfall Blue, Sunrise Copper, and Nightsky Green ) या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
तुम्हाला स्वतःसाठी हे डिव्हाइस हवे असेल तर Galaxy F13 खरेदी करण्यासाठी आता Flipkart किंवा Samsung Online Store वर जावे लागेल. विक्री आता लाईव्ह आहे. स्मार्टफोनची किंमत* 4GB + 64GB व्हेरियंटसाठी ₹10,999 आणि 4GB + 128GB व्हेरिएंटसाठी ₹11,999 आहे. इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत ICICI बँक कार्ड युजर्सना ₹1000 ची इन्संट बँक सवलत दिली जात आहे.
Disclaimer: This article has been produced on behalf of Samsung by Times Internet’s Spotlight team.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times