नवी दिल्लीः iQOO चा लेटेस्ट iQOO Neo 3 5G जबरदस्त विक्री केली आहे. कंपनीने आयोजित केलेल्या या स्मार्टफोनच्या पहिल्याच सेलमध्ये अवघ्या ३० मिनिटात १०० मिलियन युआन म्हणजेच जवळपास १०६ कोटी रुपयांच्या फोनची विक्री केली आहे. चीनमध्ये या फोनचा पहिला सेल २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. या सेलचा डेटा कंपनीने आज जारी केला आहे. नव्या फोनच्या या रेकॉर्डने कंपनी खूप आनंदी झाली आहे.

वाचाः

iQOO Neo 3 5G या स्मार्टफोनची २६९८ चिनी युआन म्हणजेच २७ हजार ७०० रुपये किंमत आहे. फोन तीन पर्यायात उपलब्ध आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आहे.

वाचाः

iQoo Neo 3 5G ची खास वैशिष्ट्ये
आयक्यू निओ ३ ५जी स्मार्टफोनमध्ये ६.५७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०८ पिक्सल आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारीत आयक्यू यूआय ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. तसेच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

आयक्यूने या फोनमध्ये ४४ वॅट फास्ट चार्जिंगच्या फीचरसह ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वाय फाय, ५जी, जीपीएस, ब्लूटूथ, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट टाइप सी यासारखे फीचर्स देण्यात आले.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here