Nothing Phone 1 Launch: बहुप्रतिक्षित Nothing Phone 1 अखेर आज भारतासह जागतिक बाजारात लाँच होणार आहे. हा फोन आज (१२ जुलै) भारतीय वेळेनुसार सायंकाळी ८:३० वाजता लाँच होईल. Nothing Phone 1 हा कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. नथिंगचे संस्थापक हे वनप्लसचे माजी सह-संस्थापक कार्ल पेई हे आहे. लाँचिंगआधीच हा फोन आपल्या डिझाइन व फीचर्समुळे विशेष चर्चेत आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी भारतात आपल्या पहिल्या इयरबड्सला लाँच केले होते. या इयरबड्सला भारतीय ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे नथिंग फोन १ ला देखील ग्राहकांची पसंती मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतात या फोनची किंमत ३५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्याची शक्यता लाँचआधीच फोनचे फीचर्स देखील समोर आले आहेत. एका ट्विटर यूजर्सनुसार नथिंगच्या या फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपये असेल. हा फोन लाँचनंतर आयफोनला टक्कर देईल असे सांगितले जात आहे. भारतीय बाजारात हा फोन सॅमसंग, मोटो, आईकूच्या फोनला जोरदार टक्कर देईल. या फोन्सविषयी जाणून घेऊया.

​Samsung Galaxy M52

samsung-galaxy-m52

Samsung Galaxy M52 स्मार्टफोन किंमत व फीचर्सच्याबाबतीत Nothing Phone 1 ला जोरदार टक्कर देईल. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या फोनची किंमत जवळपास २५ हजार रुपये आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन ७७८ चिपसेट सपोर्टसह येतो. तर रिपोर्टनुसार, नथिंगच्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७७८जी+ चिपसेटचा सपोर्ट मिळेल. Samsung Galaxy M52 फोनमध्ये ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ६.७ इंच डिस्प्ले, ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

वाचा: भारतात ‘एवढी’ असेल Nothing Phone (1) ची किंमत, लाँचआधीच खुलासा; पाहा डिटेल्स

​Poco F4 5G

poco-f4-5g

Poco F4 5G स्मार्टफोनची भारतातील सुरुवाती किंमत २८,००० रुपये आहे. यात ग्लास रियर पॅनेल, स्लीक बॉडी आणि क्विक ६७ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. फोन टाइप-सी चार्जिंग पोर्टसह येतो. यात ड्यूल सिमचा सपोर्ट दिला आहे. यात HDR10+ चा सपोर्ट दिला आहे. Poco F4 5G स्मार्टफोनमध्ये ६.७७ इंच FullHD+ डिस्प्ले, Qualcomm Snapdragon ८७० प्रोसेसर, ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

​Vivo V23 5G

vivo-v23-5g

Vivo V23 5G स्मार्टफोन देखील कमी किंमत व दमदार फीचर्ससह येतो. विवोचा हा फोन नथिंगच्या पहिल्या वहिल्या स्मार्टफोनला जोरदार टक्कर देईल. Vivo V23 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यात ६.४४ इंच डिस्प्ले, ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ५० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल ड्यूल फ्रंट कॅमेरा, ४२०० एमएएचची दमदार बॅटरी, मीडियाटेक डायमेंसिटी ९२० प्रोसेसर दिला आहे. Vivo V23 5G स्मार्टफोनची किंमत ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये आहे.

वाचा: नोकियामुळे Oppo आणि OnePlus ला ‘या’ देशात करता येणार नाही डिव्हाइसची विक्री, जाणून घ्या कारण

​Motorola Edge 30

motorola-edge-30

Motorola Edge 30 चे वैशिष्ट्ये याचा पोलेड डिस्प्ले आहे. तसेच, यात आयओएस इनबिल्ड प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला आहे. फोन स्नॅपड्रॅगन ७७८+ चिपसेट सपोर्टसह येतो. यामध्ये १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा ६.५५ इंच डिस्प्ले दिला आहे. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा, फ्रंटला ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, ४०२० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. Motorola Edge 30 स्मार्टफोनला तुम्ही २८ हजार रुपयात खरेदी करू शकता.

​iQoo Neo 6

iqoo-neo-6

iQoo Neo 6 हा गेमिंग-फोकस्ड स्मार्टफोन आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेटचा सपोर्ट मिळतो. पॉवर बॅकअपसाठी ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४७०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह येणारा ई४ एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. iQoo Neo 6 स्मार्टफोनची किंमत ३५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये आहे.

वाचा: OnePlus Nord 2T 5G ला बंपर ऑफरसह करा खरेदी, फोनवर तब्बल १० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here