नवी दिल्लीः nothing phone (1) launched : Nothing Phone (1) ला भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनची यूजर्संना खूप उत्सूकता होती. कंपनीने या फोनला भारतासह अन्य मार्केटमध्ये लाँच केले आहे. हा Nothing कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. या फोनला ट्रान्सपॅरेंट बँक सोबत आणले आहे. यात Glyph इंटरफेस सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. यात LED स्ट्राइप्स दिले आहे. फोनमध्ये OLED डिस्प्ले सोबत 120Hz रिफ्रेश रेट सुद्धा दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. Nothing Phone (1) ची किंमत आणि फीचर्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.

Nothing Phone (1) फोनची किंमत
या फोनला कंपनीने ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट सोबत आणले आहे. या व्हेरियंटची किंमत ३२ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ३५ हजार ९९९ रुपये आहे. याचा आणखी एक व्हेरियंट हाय एन्ड व्हेरियंट आहे. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत येत असून याची किंमत ३८ हजार ९९९ रुपये आहे. या फोनचा सेल २१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपासून सुरू होणार आहे. हा सेल ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आयोजित केला जाणार आहे. हा फोन ब्लॅक आणि व्हाइट या दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला जाणार आहे.

ज्या यूजर्संनी Nothing Phone (1) साठी प्री ऑर्डर केला होता. त्यांच्यासाठी या फोनची किंमत अनुक्रमे ३१ हजार ९९९ रुपये, ३४ हजार ९९९ रुपये आणि ३७ हजार ९९९ रुपये असेल. सोबत कंपनी फोनला प्री ऑर्डर केल्यानंतर काही ऑफर्स सुद्धा देत आहे. यात २ हजार रुपयाचे एचडीएफसी इंस्टेंट डिस्काउंट सोबत ३ आणि ६ महिन्याची ईएमआय (क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड) ईएमआयचा समावेश आहे. तसेच एक्सचेंज ऑफर सुद्धा दिले जाणार आहे.

Nothing Phone (1) चे फीचर्स
या फोनमध्ये ड्युअल सिम नॅनो सपोर्ट दिले आहे. हा फोन अँड्रॉयड १२ वर काम करतो. यात ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले दिले आहे. याचा पिक्सल रिझॉल्यूशन 1080×2400 आहे. यात १२० हर्ट्जचे रिफ्रेश रेट दिले आहे. यावर कॉर्निंग गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन दिले आहे. Nothing Phone (1) च्या डिस्प्ले फीचर्स मध्ये HDR10+ सपोर्ट, 402 ppi पिक्सल डेनसिटी आणि 1200 निट्स पीक ब्राइटनेस सारखे फीचर्स दिले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ SoC सोबत येतो. यात 12GB पर्यंत LPDDR5 रॅम दिले आहे. सोबत 256 जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे.

वाचाः WhatsApp वर या ८ चुका करू नका, जेलची हवा खावी लागेल, मित्रच आणतील अडचणीत

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा एक सेन्सर ५० मेगापिक्सलचा आहे. हा सोनी IMX766 सेंसर आहे. दुसरा ५० मेगापिक्सलचा सॅमसंग JN1 आहे. या फोनमध्ये पॅनारामा नाइट मोड, पोर्ट्रेट मोड, सीन डिटेक्शन, एक्सट्रीम नाइट मोड आणि एक्सपर्ट मोड सारखे फीचर्स दिले आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा Sony IMX471 सेंसर दिले आहे. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. 33W वायर्ड चार्जिंग, 15W क्यूई वायरलेस चार्जिंग आणि 5W रिवर्स चार्जिंग सपोर्ट दिले आहे.

वाचाः अवघ्या १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा दमदार फीचर्ससह येणारे पोको

तगड्या कॅमेरासोबत स्वस्तातील दोन स्मार्टफोन भारतात लाँच, फोनमध्ये ११ जीबी पर्यंत रॅमOnePlus Nord 2T चा आज पहिला सेल, 50MP रियर आणि 32MP फ्रंट कॅमेरा, डिस्काउंटही मिळेल

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here