दावा

दोन फोटोचा एक कोलाज सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. या फोटोतून दावा करण्यात येत आहे की, एका हिंदु महिलेने एका मुस्लिम मुलीला जेवण दिल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी (RSS) हिंदु महिलेला बेदम मारहाण केली.

पहिल्या फोटोत जेवण करीत असलेल्या एका मुलीच्या मागे उभी असलेली एक वृद्ध महिला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत एक वृद्ध महिला गंभीर जखमी झालेली दिसत आहे. तिच्या नाकातून रक्त येत आहे.

ट्विटर युजर अली रजा हाशमीने हा फोटो या कॅप्शनसह शेअर केला आहे की, काश्मिरी मुस्लिम मुलीसाठी जेवण बनवणाऱ्या एका हिंदु महिलेवर RSS दहशतवाद्यांनी हल्ला केला.

THE RSS Terrorist has attacked on a Hindu woman who attempt sehri for a muslim Kashmiri girl in recent days.

India is occupied by RSS.they have full control over media,judiciary,law enforcement & national securitie.
@DrAlshoreka @Dralnoaimi @LadyVelvet_HFQ @MJALSHRIKA @HasibaAmin pic.twitter.com/UmMAVE8UFB

काही अन्य ट्विटर युजर्संनी सुद्धा हा फोटो याच दाव्यासह शेअर केला आहे.

The RSS goons has attacked on a Hindu woman who attempt ssehri for a muslim
@Rameezmakhdoomi @GreaterKashmir
@kashmirobserver @OmarAbdullah

खरं काय आहे ?

मुस्लीम मुलीसाठी जेवण बनवले म्हणून RSS च्या कार्यकर्त्यांनी हिंदु महिलेवर हल्ला केल्याचा दावा खोटा आहे. दोन्ही फोटोतील महिला या वेगवेगळ्या आहेत. जखमी झालेली व नाकातून रक्त येत असलेली महिला ही गुजरातची आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या हिंसाचारात ती जखमी झाली होती.

कशी केली पडताळणी ?

फोटोला लक्षपूर्वक पाहिल्यास या फोटोतील दोन्ही महिला या वेगवेगवळ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आम्ही या फोटोला क्रॉप करून ते सर्च केले. त्यानंतर आम्हाला खरा फोटो मिळाला.

पहिला फोटो २५ एप्रिल २०२० रोजी अनेक ट्विटर युजर्संनी शेअर केला होता.

ट्विटर युजर Guftar Ahmed ने हा फोटो शेअर करताना लिहिले होते की, भारतातील खरा फोटो. एका मुस्लिम मुलीला जेवण जेवू घालताना एक हिंदु महिला.

गंभीर जखमी झालेली दिसत असलेल्या महिलेचा दुसरा फोटो तीन अन्य फोटोसोबत २५ फेब्रुवारी रोजी अंकित राजपूत नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला होता. गुजरातमधील खंबाटमध्ये झालेल्या हिंसाचार संबंधित कॅप्शनसोबत शेअर केला होता.

यूट्यूबवर संबंधित की वर्ड्सला टाइम फिल्टर सोबत सर्च केल्यानंतर आम्हाला TV9 गुजरातीच्या चॅनेलवर २५ फेब्रुवारी २०२० रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. ज्यात ही गंभीर जखमी झालेली महिला दिसत होती. त्याच महिलेचा फोटो आता व्हायरल होत आहे.

व्हिडिओचे शीर्षक ‘Anand: Group clash; Residents still under fear in Khambhat’ होते. व्हिडिओत १:४७ मिनिटांवर या महिलेला पाहू शकता. जो फोटो आता शेअर केला जात आहे.

निष्कर्ष

दोन वेगवेगळे फोटो या दाव्यासोबत शेअर केले जात आहे की, RSS च्या लोकांनी एका हिंदु महिलेवर हल्ला केला. कारण, या महिलेने एका मुस्लिम मुलीसाठी सकाळी उठून जेवण बनवले होते. परंतु, हा दावा खोटा असल्याचे ‘मटा ‘च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.



Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here