स्मार्टफोन खरेदी करताना यूजर्स सर्वात आधी कॅमेरा संबंधी विचारतात. स्मार्टफोनमध्ये किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सेल्फी मध्ये कंपनीने किती मेगापिक्सल आणि रिझॉल्यूशन दिले आहे. हे सगळं चेक केल्यानंतर अनेक जण स्मार्टफोन खरेदी करण्याला पसंती देत असतात. रील्स आणि सेल्फी चाहत्यांसाठी कॅमेरा बेस्ट असायला हवा. जास्तीत जास्त यूजर्सच्या माहितीनुसार, आयफोन सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. परंतु, नुकत्याच समोर आलेल्या स्मार्टफोन कॅमेरा रेटिंग्स पाहिल्यास तुम्हाला धक्काच बसू शकतो. वर्ष २०२२ च्या बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्सची रेटिंगला DXOMARK ने रिलीज केले आहे. ज्यात iPhone 13 Pro सर्वात खालच्या नंबरवर (5th rank) आहे. या लिस्टमध्ये खास वैशिष्ट्ये म्हणजे यात चायनीज कंपनीचा दबदबा आहे. जाणून घ्या यासंबधीची ही खास माहिती.

​पहिल्या नंबरवर ऑनरचा फोन

DXOMARK च्या रेटिंग मध्ये Honor Magic4 Ultimate ला पहिले स्थान मिळाले आहे. याच्या रेटिंगमध्ये १४६ प्वॉइंट मिळाले आहेत. कंपनीचा हा फोन पेंटा रियर कॅमेरा सेटअप सोबत येतो. यात 50 मेगापिक्सल चा OIS प्रायमरी कॅमेरा सोबत एक 50 मेगापिक्सलचा स्पेक्ट्रम इनहँस्ड कॅमेरा, एक 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, 3.5x डिजिटल झूमचा एक पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि एक डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 3D डेप्थ सेंसर सोबत 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचा: ८,९९९ रुपयांमध्ये लाँच झाला ‘हा’ Smart TV, मिळणार जबरदस्त डिस्प्ले आणि साउंड क्वालिटी, पाहा सेल डेट

​हुवावे 50 प्रो दुसऱ्या नंबरवर

-50-

हुवावेचा Huawei P50 Pro हा फोन रेटिंग मध्ये १४४ गुणांसोबत दुसऱ्या नंबवर आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ६४ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि एक ४० मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी कंपनीने या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचा: UPI Tips: फोन हरविल्यास किंवा चोरी गेल्यास घाबरुन न जाता ‘असे’ Deactivate करा UPI अकाउंट, पाहा प्रोसेस

तिसऱ्या नंबरवर शाओमी Mi 11 अल्ट्रा

-mi-11-

शाओमीचा mi 11 ultra हा फोन कॅमेरात खूपच शानदार आहे. याच कारणामुळे DXOMARK च्या रेटिंगमध्ये या फोनला १४३ गुण मिळाले आहेत. कंपनी या फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप ऑफर करीत आहे. यात 50 मेगापिक्सलचा OIS प्रायमरी कॅमेरा सोबत एक 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि एक 48 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेराचा समावेश आहे. फोनमध्ये मिळणारा हा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा 5X ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट मध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचा : स्वस्त Second Hand Smartphone खरेदी करण्याच्या नादात ‘या’ गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, होईल नुकसान

​हुवावे मेट 40 प्रो चौथ्या नंबरवर

-40-

हुवावेच्या Huawei Mate 40 Pro या प्रीमियम स्मार्टफोनला चौथे स्थान मिळाले आहे. रेटिंग मध्ये या फोनला १३९ पॉइंट मिळाले आहेत. फोनमध्ये पाच रियर कॅमेरे दिले आहेत. यात ५० मेगापिक्सलचा OIS प्रायमरी कॅमेरा सोबत एक २० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक १२ मेगापिक्सलचा 3x ऑप्टिकल झूमचा टेलिफोटो लेन्स, एक 10x ऑप्टिकल झूमचा ८ मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि एक डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. फोनच्या फ्रंटमध्ये कंपनीने १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर दिले आहे.

वाचाः आज रात्री दिसणार वर्षातील सर्वात मोठा Supermoon, जाणून घ्या डिटेल्स

आयफोन १३ प्रो पाचव्या स्थानावर

DXOMARK च्या कॅमेरा रेटिंग मध्ये iPhone 13 Pro ला १३७ प्वॉइंट मिळाले. याची रँकिंग ५ वी ठरली आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सोबत एक १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमचा १२ मेगापिक्सलचा एक टेलिफोटो कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर दिले आहे. आयफोन १३ प्रो मध्ये अॅपल कंपनीने १२ मेगापिक्सलचा एक सेल्फी कॅमेरा सुद्धा दिला आहे. आयफोनला जगभरात खूप मोठी मागणी आहे. भारतात सुद्धा आयफोन खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. परंतु, याची किंमत खूप जास्त असल्याने फोन खरेदी करणे शक्य होत नाही.

वाचाः जगातील पहिला पारदर्शक दिसणाऱ्या Nothing Phone (1) ची या टॉप ५ फीचर्समुळे जोरदार

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here