वाचाः
आणि
सॅमसंग गॅलेक्सी A50sच्या किंमतीत २ हजार ४१७ रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर गॅलेक्सी M21 च्या स्मार्टफोनच्या किंमतीत १ हजार २३ रुपयांची कपात करण्यात आली आहे. या दोन्ही मोबाइलच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर गॅलेक्सी M21 च्या ४ जीबी रॅम स्मार्टफोनची किंमत आता १३ हजार १९९ रुपये झाली आहे. तर गॅलेक्सी ए५०एसची किंमत आता १८ हजार ५९९ रुपये झाली आहे. नवीन किंमत सॅमसंगच्या साईट शिवाय अॅमेझॉनवरही दिसत आहे.
वाचाः
Samsung Galaxy M21 ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. फोनमध्ये गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन दिले आहे. तसेच या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-G72 MP3 GPU देण्यात आला आहे.
वाचाः
Samsung Galaxy M21 चा कॅमेरा
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि तिसरा लेन्स ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सपोर्ट देण्यात आला आहे.
वाचाः
Samsung Galaxy M21ची बॅटरी
फोनमध्ये ४जी व्होल्ट, वाय फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाईप सी पोर्ट, ३.५ एमएमचे हेडफोन जॅक आणि बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. गॅलेक्सी एम२१ मध्ये ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १५ वॅटचा फास्ट चार्जरचा सपोर्ट दिला आहे. या फोनचे वजन १८८ ग्रॅम आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A50s ची वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलेक्सी ए५० एस मध्ये ६.४ इंचाचा एफएचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. या डिस्प्लेत फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. तसेच फोनमध्ये एक्सिनॉस ९६१० चिपसेट प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबीचा इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.
वाचाः
सॅमसंग गॅलेक्सी A50s चा कॅमेरा
या फोनमध्ये बॅकला ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल आण ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी प्रेमींसाठी यात ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४ व्हीओएलईटी, जीपीएस, वायफाय, यूएसबी पोर्ट सी यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच गॅलेक्सी ए५० एसमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरीसह फास्ट चार्जिंग फीचर दिले आहेत.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times